अर्णब गोस्वामीवरील हल्ल्याचा बॉलीवूडकरांकडून निषेध!

    दिनांक  23-Apr-2020 18:35:21
|
bollywood_1  H

सरकारने सुरक्षा द्यावी कलाकारांकडून मागणी 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर मुंबईमध्ये हल्ला करण्यात आला. या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरांतून निषेध होत असतानाच, बॉलीवूडची कलाकार मंडळीदेखील अर्णब गोस्वामीच्या समर्थनार्थ ट्विट करत त्याला आपला पाठींबा दर्शवत आहेत. या हल्ल्याचा निषेध करत, सरकारने अर्णब गोस्वामीला सुरक्षा द्यावी अशी  मागणी बॉलीवूडमधून होत आहे.


चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांनी या हल्ल्याच्या निषेधार्थ "रिपब्लिक टीव्हीचे चीफ अरनब गोस्वामी यांच्यावरील हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो", असे ट्विट केले.

तर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही अर्णब गोस्वामीच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. ‘अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीवरील हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. देश बदलला आहे. या गोष्टी आता चालणार नाहीत. अर्णब! देशातील कोट्यवधी लोक तुमचे संरक्षक बनतील. तुम्हाला कोणी काहीच करू शकणार नाही’, अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी अर्णबला आपला पाठींबा दर्शवला.
या हल्ल्याचा निषेध करत चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अर्णबला सरकारने सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.अनुराग कश्यपनेही या हल्ल्याचा निषेध करत अर्णब गोस्वामीला आपला पाठींबा दर्शविला आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.