बिल गेट्सकडून नरेंद्र मोदींच्या 'कोरोना' लढ्याचे कौतुक!

23 Apr 2020 10:14:35

bill gates_1  H



विक्रमी 'आरोग्यसेतू अॅप'चीही केली स्तुती


न्यूयॉर्क : ‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘कोरोना’सोबतच्या लढ्यात केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले आहे. गेट्स यांनी मोदींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कोरोना रुग्णांविषयी माहिती देणाऱ्या ‘आरोग्यसेतू अॅप’चीही बिल गेट्स यांनी स्तुती केली आहे.


‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच उपाययोजना आखत कठोर निर्णय घेतल्यामुळे भारतातील कोरोनाच्या संसर्ग दरात घट दिसत आहे. हे संपूर्ण जगासाठी आदर्श उदाहरण आहे. तुमचे नेतृत्व, तुमच्या सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचे कौतुक करतो.’ असे बिल गेट्स म्हणतात.


‘तुमच्या सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेणे, क्वारंटाईन करणे, हॉटस्पॉट ओळखण्यासाठी चाचण्या वाढवणे, आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे, असे घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत, असे गेट्स यांनी पत्रात लिहिले आहे.


‘मला खरंच आनंद आहे, तुमचे सरकार ‘कोविड-१९′ शी लढण्यासाठी असामान्य डिजिटल क्षमतांचा पूर्णपणे वापर करत आहे. कोरोना व्हायरस ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि जनतेला आरोग्य सेवांशी जोडण्यासाठी आरोग्य सेतू डिजिटल अॅप लॉंच करण्याचे उत्तम निर्णय घेतले आहेत’ अशी स्तुतीही बिल गेट्सनी यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0