पालघरमध्ये साधूंची हत्या करणाऱ्यांवर भडकली रविना टंडन!

    दिनांक  21-Apr-2020 15:53:33
|
Palghar_1  H xरवी किशन, सोनाक्षी सिन्हानेही व्यक्त केला संताप

मुंबई : महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधूंसह एकाला मारहाण झाल्यानंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळत आहे. सोशल मीडियावर लोक सतत आपला संताप व्यक्त करत असतात. या घटनेबद्दल बॉलिवूड स्टार्सही खूप चिडले आहेत. जावेद अख्तर आणि अनुपम खेर यांच्यासारख्या बड्या स्टार्सनी या घटनेचा निषेध केला आहे. आता पालघर घटनेवर अभिनेत्री रवीना टंडननेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.


या घटनेने रवीना टंडन खूप दुखावली आहे. ट्विटद्वारे रवीनाने लिहिले आहे की, 'टीव्हीवर दाखवला जाणारी साधू हत्येची दृश्य खूप त्रासदायक आहेत. संशयाच्या आधारे त्यांना निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. हे खूप त्रासदायक आहे. तिथे पोलिस काय करत होते?’असा सवाल देखील तिने उपस्थित केला आहे.

रवि किशन यांनीही आपल्या ट्विटरवरून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेवर त्यांनी ट्विट करत पोलिसांवर निशाणा साधला आहे. अभिनेत्याने लिहिले- 'सनातन धर्माच्या साधूंचे संपूर्ण आयुष्य संपले. पोलिस मौन प्रेक्षक बनून का उभे राहिले? '

तर सोनाक्षी सिन्हाने या घटनेचा निषेध करत आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे, 'पालघर मॉब लिंचिंगमध्ये माणुसकीची अत्यंत वाईट परिस्थिती दिसून येते. अशा प्रकारे एखाद्याला मारणे खूप भितीदायक आहे. आशा आहे की तेथे न्याय मिळेल.'


पालघरमध्ये जमावाकडून झालेल्या हल्ल्यात चोर समजून दोन साधू व त्यांच्या वाहनाच्या ड्रायव्हरला दगडाने ठेचून ठार करण्यात आले, या घटनेमुळे सध्या सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. ही मॉब लिंचिंगची घटना अत्यंत लाजीरवाणी असल्याचे अनेकांनी म्हंटले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.