कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत स्थलांतरबंदी!

21 Apr 2020 12:33:42
Donald trump_1  


नागरिकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी डोनाल्ड यांच्या निर्णय



न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतराला तात्पुरती स्थगिती देण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेत कायमस्वरुपी वास्तव्य करण्यासाठी परदेशातून होणारे स्थलांतर तूर्तास थांबवण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करणार असल्याचे ट्रम्प सोमवारी रात्री म्हणाले. ‘कोरोना’ संकटकाळात अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.


‘कोरोना व्हायरस’ साथीच्या आजारामुळे झालेल्या आरोग्य आणि आर्थिक नुकसानाशी अमेरिका झुंजत असल्याने अमेरिकेत स्थलांतरावर पूर्णपणे बंदी आणण्याचा ट्रम्प यांचा होरा आहे. नुकतंच भारताने अमेरिकेला ‘कोरोना’वरील उपचारात सध्या महत्त्वाचे ठरणारे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवून मदतीचा हात दिला आहे. अशात परदेशातून स्थलांतराला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय भारतातून अमेरिकेत जाण्याचे नियोजन करणाऱ्या होतकरूंना धक्कादायक आहे.





‘अदृश्य शत्रूकडून झालेला हल्ला आणि आमच्या अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या टिकवण्याची गरज लक्षात घेता मी अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून होणारे स्थलांतर तात्पुरते स्थगित करण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करणार आहे’ असे ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.परदेशातून होणारे कायमस्वरुपी स्थलांतर रोखण्यासाठी अमेरिका कोणती यंत्रणा वापरणार, ही स्थगिती किती काळ टिकणार किंवा सद्य ग्रीन कार्डधारकांवर याचे काय परिणाम होणार, हे अद्याप अस्पष्ट आहे.
Powered By Sangraha 9.0