दहशतवाद की मानवतावाद?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2020   
Total Views |


bangladesh_1  H


प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असला तरी इतर धर्मांविषयी इतकी कटुता आणि हिंसा ही कोणत्याही धर्माची शिकवण नाहीच. त्यामुळे मानवतावाद की दहशतवाद याचा विचार मुस्लीमजगताला आता मुळापासून करायची वेळ आली आहे.


 
अदृश्य अशा कोरोना विषाणूच्या उद्रेकाने जागतिक दृश्य मात्र पार बदलून टाकले. पृथ्वीची भौतिक गती मंदावली नसली तरी पृथ्वीतलावरील मानवाची अगतिकता यानिमित्ताने समोर आली. कोरोनापासून बचावासाठी अख्ख्या जगाला ‘लॉकडाऊन’ व्हावे लागले. पण, आजवरच्या एकूणच जागतिक घडामोडींचा, अनुभवांचा विचार करता, भारत असो अथवा इतर देशांतही मुस्लीम लोकसंख्येला या महामारीचे सोयरसुतक नसल्याचेच दिसून आले. भारतासह पाकिस्तानातही जमातींनी कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता वाढवली. एवढेच नाही तर मंदिरे, चर्च, गुरुद्वारा आणि इतर प्रार्थनास्थळांना शिस्तीत टाळेबंदी केल्यानंतरही मशिदींमधील गर्दी हटवण्यासाठी बर्‍याच देशांमध्ये पोलिसी बळाचा वापर करावा लागला. त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो की, मुस्लीम समुदायाला या महामारीचे गांभीर्य समजलेले नाही की त्यांची समजून घेण्याची मानसिकताच नाही?
 

काश्मीरमध्ये ज्याप्रमाणे एका दहशतवाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्ययात्रेला ऐन निर्बंध धुडकावून लावत हजारोंच्या संख्येने लोक जमले, तसेच चित्र शेजारच्या बांगलादेशातही निदर्शनास आले. फक्त तेथील गर्दी जमली होती ती एका मौलानाच्या अंत्यविधीसाठी, जी पोलिसांच्याही नियंत्रणबाहेर गेली. अशा शेकडो घटनांनी केवळ भारत सरकारचीच नाही, तर पाकिस्तान, बांगलादेश आणि इतर मुस्लीम राष्ट्रांचीही झोप उडाली आहे. कारण, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याशिवाय गत्यंतर नाहीच. पण, ‘अल्ला आपल्या पाठीशी असताना कोरोना आपल्या केसालाही स्पर्श करू शकत नाही,’ याच आविर्भावात बहुतांशी मुस्लीम समुदाय वावरताना दिसतो. सौदी, युएई या इस्लामिक राष्ट्रांमध्ये मात्र कडक कायद्यांमुळे लोकांनी घराबाहेर पडण्याची फारशी हिंमत केली नाही, असे प्रथमदर्शनी म्हणावे लागेल. युरोपमध्येही काही मुसलमानांच्या अशाच बेजबाबदार वर्तनाने त्यांच्यावर टीकेची झोड उठली. ‘इसिस’मुळे उद्ध्वस्त झालेल्या लाखो मुस्लीम निर्वासितांना आसरा देणार्‍या युरोपीय राष्ट्रांना आता त्याच्या झळा प्रकर्षाने बसू लागल्या आहेत. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यावर त्यांच्या मुस्लीमधार्जिण्या भूमिकेमुळे सध्या जर्मन नागरिकांचीही द्वेष पत्करावा लागतोय. तिथे परिस्थिती इतकी चिघळली आहे की, मुसलमानांनी मशिदीबाहेर संरक्षण देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. याचे कारण म्हणजे युरोपीय देशांमध्ये खासकरून जर्मनी, फ्रान्समध्ये वाढलेला ‘इस्लामोफोबिया.’ पण, निर्वासितांना आश्रय देण्यापूर्वीही या युरोपीय देशांमध्ये मुस्लीम लोकसंख्या वास्तव्यास होतीच.

तेव्हाही अशा तुरळक घटना युरोपच्या कानाकोपर्‍यातूनही समोरही आल्या. पण, आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. शांती नव्हे तर दहशतवादाशी जोडला गेलेला धर्म म्हणजे इस्लाम, अशी जागतिक ओळख याच धर्माच्या काही जात्यांध, कट्टर हल्लेखोरांनी, दहशतवाद्यांनी निर्माण केली असून ती अमेरिकेवरील ९/११च्या हल्ल्यानंतर आणखीन गडद झाली. युरोपमधील २० दशलक्ष मुस्लीम लोकसंख्येमुळे युरोपचे हळूहळू इस्लामीकरण होईल, आपली मुक्त जीवनशैली, धर्म धोक्यात येईल, ही भीती युरोपीय जनमानसांत घर करुन आहे. परिणामस्वरुप, युरोपमध्ये मुसलमानांवरील हल्ल्यांचे प्रमाणही वाढलेले दिसते. त्यातच या कोरोनासंकटाच्या काळात काही मुसलमानांनी दाखवलेला बेशिस्तपणा, समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केलेले द्वेषमूलक व्हिडिओज यामुळे या धर्माविषयीच्या नकारात्मक भावनेत जागतिक पातळीवर भर पडलेली दिसते. आजवरचा एकूणच अनुभव बघता, या समाजातील कट्टरतावाद्यांकडून सुधारणेेची अपेक्षा करणेच मुळी फोल ठरावे. पण, तरीही समाजातील धर्म अभ्यासक, मौलवी यांनी कोरोनाच्या निमित्ताने का होईना, याचे जागतिक इस्लामिक स्तरावर चिंतन जरुर करावे. प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असला तरी इतर धर्मांविषयी इतकी कटुता आणि हिंसा ही कोणत्याही धर्माची शिकवण नाहीच. त्यामुळे मानवतावाद की दहशतवाद याचा विचार मुस्लीमजगताला आता मुळापासून करायची वेळ आली आहे. त्याची पहिली पायरी आहे निश्चितच इस्लामिक शिक्षणामध्ये आमूलाग्र बदलाची आणि त्याला समकालीन शिक्षण, विज्ञानाशी जोडण्याची. याचा गांभीर्याने विचार न झाल्यास आगामी काळात त्याचे परिणाम इस्लामिक जगतासह संपूर्ण जगाला भोगावे लागतील.

 
 
@@AUTHORINFO_V1@@