‘लॉकडाऊन’च्या काळात भोसलांचा निराधारांना आधार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2020
Total Views |


bhosla_1  H x W


निराधारांना मदतीचा आधार देत खर्‍या अर्थाने ‘भोंसला’ केवळ शैक्षणिक ज्ञान देणारे नसून सोबत सामाजिक बांधिलकी जपणारे कृतिशील अग्रदूत ठरले, असे म्हणणे वावगे ठरू नये. अखेरीस या लेखाच्या माध्यमातून तमाम घर बसलेल्या बांधवांना आणि विद्यार्थ्यांना एकच आवाहन करतो की, घरी राहा, निरोगी राहा, सुरक्षित राहा. संस्थेच्या या कार्याला हातभार लावणार्‍यांना शुभेच्छा !


‘सेवा है यज्ञकुन्ड
समिधा सम हम जलें
ध्येय महासागर में
सरित रूप हम मिलें ।
लोक योगक्षेम ही राष्ट्र अभय गान हैं
सेवारत व्यक्ती व्यक्ती
कार्य का ही प्राण है’!

 


या उक्तीला सार्थ करण्याचे कार्य ‘लॉकडाऊन’च्या अतिमहत्त्वाच्या काळात ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ने पार पाडले. ‘लॉकडाऊन’ जाहीर होताच सामाजिक भान जपत स्थलांतरित मजुरांना नाशिकला थांबवल्यानंतर त्यांना समुपदेशन करण्यासाठी पुढे सरसावले. आपले उत्तरदायित्व ओळखून या मजुरांना भावनिक आधार देण्यासाठी ‘टीम भोंसला’ने जिल्हा प्रशासनासोबत खारीचा वाटा उचलला. कोरोनासारख्या विषाणूने सार्‍या जगात थैमान घातले असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारतीयांना घरी राहण्याचा आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला. तो सर्वतोपरी सारेच भारतीय अंमलात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतं आहे. हे सकारात्मक चित्र असले तरी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपले गाव सोडून परराज्यातून आलेल्या मजुरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. कारण काम-धंदे बंद झाले. पुढे काय या पडलेल्या विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी खंबीर हवे त्यांचे मन. त्यासाठी गरज होती, त्यांना प्रेमाचा ओलावा देण्याची. ती भरून काढली ‘टीम भोंसला’च्या सदस्यांनी. समुपदेशनातून त्यांनी इथेच थांबा, घाबरू नका आम्ही, पण आपले कुटुंबीयच आहोत. ‘टीम भोंसला’ आणि भोंसला परिवार तुमच्यासाठी सज्ज आहे. असा धीर दिला.
 

 


आता गरज आहे, प्रत्येकाने मानसिक स्थैर्य कायम ठेवण्याची. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक भान जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्थेने आणि ‘भोंसला मिलिटरी कॉलेज’ने केला. समुपदेशनासाठी महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाचा पुढाकार प्रशंसनीय ठरला. त्यासोबतच या टीममध्ये एकूण २०० जण जोडले गेले आहेत. दुसरीकडे भयावह स्थिती म्हणजे रोजंदारीवर काम करणार्‍या मोलमजुरी करणार्‍यांची झाली. अशा स्थितीत त्यांच्यावर आणि कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून ‘भोंसला कॉलेज’च्या नजीक असलेल्या संत कबीर नगर भागात राहणार्‍या नागरिकांना संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या टीमने मोफत अन्नधान्य आणि किराणा वाटप केला. निराधारांना मदतीचा आधार देत खर्‍या अर्थाने ‘भोंसला’ केवळ शैक्षणिक ज्ञान देणारे नसून सोबत सामाजिक बांधिलकी जपणारे कृतिशील अग्रदूत ठरले, असे म्हणणे वावगे ठरू नये. अखेरीस या लेखाच्या माध्यमातून तमाम घर बसलेल्या बांधवांना आणि विद्यार्थ्यांना एकच आवाहन करतो की, घरी राहा, निरोगी राहा, सुरक्षित राहा. संस्थेच्या या कार्याला हातभार लावणार्‍यांना शुभेच्छा ! यापुढेदेखील कोणत्याही आपत्तीप्रसंगी ‘भोंसला’ अग्रभागी होती, आहे आणि कायम राहणार, असा विश्वास देत माझ्या भावनांना इथेच पूर्ण विराम देतो. इतकेच म्हणावेसे वाटते या सांघिक पद्यातून...
 

 

‘दीन हीन सेवा ही परमेष्टी अर्चना
केवल उपदेश नही कर्मरूप साधना।
मन वाचा कर्म से सदैव एक रूप हो
शिवसुन्दर नव समाज विश्ववन्द्य हम गढे!!’
 

 

तेजस पुराणिक
संकलन - संजय साळवे

सकारात्मकतेचे बळ

 

कोरोना व्हायरसची कीड लागून संपूर्ण जग पोखरले जात आहे. अशा परिस्थितीतही कुठेतरी सकारात्मकतेच्या वेली फुलवण्याचे काम ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ करत आहे. संस्थेने शिक्षकांसाठी अनेक माहितीपर विषयांवर ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले. त्यामधून शिक्षकांनाही बर्‍याच गोष्टी शिकता येत आहेत. वेळ सत्कारणी लावता येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षक ‘टेक्नोसिव्ह’ झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी ऑनलाईन क्लासेस कसे चालतात हेदेखील बर्‍याच लोकांना माहीत नव्हते.

 

- प्रांजली आफळे, शिक्षिक

अभ्यासपूर्ण संवाद आणि ऑनलाईन शाळा

 

२२ मार्चला देश ‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्याची घोषणा झाली आणि प्रत्येकाच्या मनात भीती, चिंता व काळजी निर्माण झाली. पण, संस्थेच्या नेतृत्वाने या सर्वांना एका सकारात्मक वातावरणात रुपांतरीत केले. विद्यार्थी शिक्षक, पालक यांच्या सृजनात्मकशक्तीला पंख फुटले. ‘अभ्यासपूर्ण संवाद आणि ऑनलाईन शाळा’ विद्या प्रबोधिनीचा उपक्रम अगळा वेगळा हे दाखविले, आमच्या शाळेने अर्थात विद्या प्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यमाने. संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या एकत्रित चर्चा व नियोजनातून ‘लॉकडाऊन’ च्या काळातही आमची शाळा अ‍ॅपच्या माध्यमातून सुरू आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यासोबत सामाजिक बांधिलकी जपत कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यातही आमच्या शिक्षिका व विद्यार्थी यांनी खारीचा वाटा उचलला आहे. ‘रोटरी क्लब’अंतर्गत आरोग्याची काळजी, योग्य आहार, स्वच्छता व सोशल डिस्टन्सिंग’ इ. वर आधारित संदेशात्मक व्हिडिओ बनवून युट्यूबवर प्रदर्शित केले आहेत. कोरोनावर आधारित ‘भारुड’ सादरीकरण तळवशे आमच्या विद्यार्थिनींनी (सुमती कुलकर्णी, प्रेरणा कुलकर्णी, मृदुला कुलकर्णी) केले, तर अथर्व जगताप याने ‘कुणी व्हेंटिलेटर देतं का व्हेंटिलेटर’, युट्यूबद्वारे स्वगत सादर करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे देश ‘लॉकडाऊन’ झालेला असला तरी प्रयत्न आणि ज्ञानसाधनेला ‘लॉकडाऊन’च्या मर्यादा नसतात हेच यातून सिद्ध होते.

 

- शुभांगी वांगीकर, मुख्याध्यापिका
 

‘ऑनलाईन वर्ग नव्हे आम्ही सगळे एक कुटूंब’

 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्व शाळा बंद करण्याचा सूचना निघाल्या आणि त्या अंतर्गत आमची शाळाही अगदी अचानक बंद झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार होते. त्यावेळी आमच्या मुख्याध्यापकांकडून ऑनलाईन शिक्षण संदर्भात सूचना प्राप्त झाल्या. यानंतर आपण अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत तेव्हा सर्व शिक्षकांनी स्वतः अ‍ॅप डाऊनलोड करावे आणि पालकांनाही तसे सांगावे, असे सांगण्यात आले. वर्गातल्या दहा मुलांना जरी लाभ झाला तरी चालेल, पण आपल्याला ऑनलाईन क्लासेस घ्यायचेच आहेत, असं फर्मान निघाल्यानंतर आम्ही अ‍ॅप डाऊनलोड केलं आणि पालकांनाही तशा सूचना दिल्या. सुरुवातीला वर्गातल्या ३० ते ४० टक्के विद्यार्थ्यांनी अ‍ॅप डाऊनलोड केले आणि पहिली कॉन्फरन्स झाली. जवळ जवळ १५ दिवसांनी विद्यार्थी, पालक आणि मी एकमेकांना भेटत होतो, संवाद साधत होतो. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या चेहर्‍यावरील आनंद बघून मीसुद्धा समाधानी झाले. त्याच वेळी जे विद्यार्थी या प्रवाहात नाहीत त्यांनाही यात सामील करून घेण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे पालकांना फोन करून ऑनलाईन वर्गाचे महत्त्व समजावले. आता जवळजवळ ७० टक्के विद्यार्थी यात सहभागी झाले. प्रत्यक्ष जरी आपण विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घेऊ शकत नसलो तरी आता मात्र आपल्या घरात बसून हे हे सहज शक्य आहे आणि म्हणूनच कुटुंब ओळख हा उपक्रम घेण्याचे ठरवले.

 

- ज्योती रत्नपारखी-वालझाडे, शिक्षिका

गरजूंना अन्नधान्य वाटप
 
‘लॉकडाऊन’मुळे सर्व व्यवहार, रोजगार, कामधंदे ठप्प झाले. ‘लॉकडाऊन’मध्ये गरिबांची उपासमार होत असताना या गोष्टींचा विचार करून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. वाय. कुलकर्णी यांनी संस्थेचे कार्यवाह हेमंत देशपांडे, सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार ‘भोंसला मिलिटरी महाविद्यालया’च्या बाजूला असणार्‍या संत कबीर नगर झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या आणि मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणार्‍या गरीब आणि गरजू कुटुंबांना मदतीचा हात पुढे केला. त्यांना अन्नधान्य व किराणा देऊन एकप्रकारे सामाजिक बांधिलकी जपली आहे. महाविद्यालयाचे प्रा. मिलिंद पाडेवार, संत कबीर नगरमधील ‘संबोधी नॉलेज युथ फाऊंडेशन’चे पदाधिकारी प्रा. अनिल बचाटे, दिनेश जाधव, भैय्यासाहेब साळवे, विजय साळवे, भगवान जाधव, संतोष धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध कंठे, निलेश जाधव, कदम यांच्या उपस्थितीमध्ये व डॉ. रोशन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू नागरिकांना अन्नधान्य व किराणा वाटण्यात आला.

 

 
 
@@AUTHORINFO_V1@@