नियम मोडणाऱ्यांना वीरू स्टाईल संदेश, म्हणाला...

20 Apr 2020 15:12:18

virendra sehwag_1 &n
 
 
मुंबई : सध्या कोरोनामुळे संपूर्ण देश हैराण आहे. अशामध्ये लॉकडाऊन वाढवल्यानंतर सर्वत्र पोलिसांचा कडेकोट पहारा आहे. तरीही काही अतिउत्साही लोक विनाकारण घराच्या बाहेर पडत आहेत. अशांना भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने त्याच्या स्टाईलमध्ये ट्विट करत अशा भटक्यांना शिक्षा करू नका, तर कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी पाठवा असे आवाहन केले आहे.
 
 
 
 
 
देशभरात लॉकडाऊन असताना कोणीही उगाच घराबाहेर पडू नये असे सर्व स्तरांमधून सांगण्यात येत आहे. तरीही, काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांना वीरू स्टाईल संदेश देताना तो म्हणतो, “जे लोक लॉकडाउन काळातही विनाकारण रस्त्यांवर भटकंती करत आहेत, त्या लोकांना शिक्षा करू नका. त्यापेक्षा त्या लोकांना थेट करोनारूग्णांच्या सेवेसाठी रूजू करा, कारण या लोकांना खात्री आहे की करोना व्हायरस त्यांचं काहीही वाकडं करू शकणार नाही.”
 
 
Powered By Sangraha 9.0