साधूंची हत्या : मुख्यमंत्री म्हणतात गैरसमजातून; पोलीस म्हणतात गुन्ह्याचा कट रचून

20 Apr 2020 15:34:07
UT_1  H x W: 0
 
 
 
 

पालघर जमाव मारहाण प्रकरण



मुंबई : पालघरमध्ये दोन साधूंच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीत विरोधाभास असल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात कि, गैरसमजातून या हत्या झाल्या तर पोलीसांनी दिलेल्या माहितीत ४०० ते ५०० व्यक्तींनी हत्येचा कट रचून हा हल्ला केल्याचे म्हटले आहे. यामुळे या प्रकरणाला एक नवे वळण लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पालघर हत्या प्रकरणावर देशभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत.
 
 
 
 
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी दोन वाजता फेसबूक लाईव्हद्वारे पालघर प्रकरणाबद्दल माहिती देत हा प्रकार गैरसमजातून घडला आहे, असे म्हटले. सर्व दोषींवर कठोर कारवाई करत सीआयडी चौकशी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, त्यांनी हे प्रकरण निव्वळ गैरसमजामुळे घडले असल्याचा दावा केला आहे. तरीही सर्व आरोपींना कठोर शिक्षा करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलीसांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीत मुख्य पाच आरोपी आणि इतर चारशे ते पाचशे जणांच्या गटाने गुन्ह्याचा कट रचून मारहाण केली, असल्याचे म्हटले आहे.
 
 
 
 
आरोपींनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी लागू असतानाही अशाप्रकारे जमत पीडित साधूंना मारहाण करणे, शासकीय वाहनांची तोडफोड करणे आदी गुन्ह्यांखाली सर्वांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस आणि राज्य सरकारच्या माहितीत तफावत का ?, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.




Powered By Sangraha 9.0