धक्कादायक! रुग्णाच्या कुटूंबियांची कोरोना टेस्टच नाही

20 Apr 2020 21:10:12
CM Uddhav Helath Minister
 
 
 
 
 

भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 
 
 
मुंबई : घाटकोपरच्या पंतनगर येथे आढळलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची सहा दिवस उलटूनही चाचणी झालेली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मुंबई महापालिका भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पत्राद्वारे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. तसेच पालिका वैद्यकीय अधिकारी कुठल्या तत्वांचे पालन करत आहेत, याची माहिती घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
 
 
 
 
 
 
 
मुंबई महापालिका 'एन' विभागातील घाटकोपरच्या पंतनगर येथील इमारत क्रमांक ७६ मध्ये एका पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, अपेक्षेप्रमाणे त्यांच्या घरातील कुटूंबियांची कोरोना चाचणी होणे अपेक्षित होते. तसेच त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचीही चाचणी होणे अपेक्षित होते. कोरोना रुग्णावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र, अद्याप घरच्यांची कोरोना चाचणी झाली नसल्याने रुग्णाला घरी पाठवता येणे शक्य नाही. दरम्यान, या सर्वांची कोरोना चाचणी करावी, अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. कोरोना रुग्णाचे आई-वडिल ज्येष्ठ नागरिक असून त्यांना संक्रमणाचा जास्त धोका आहे, मात्र, सहा दिवस उलटूनही कोरोना टेस्ट न झाल्याने शिंदे यांनी या प्रकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
 
 
 
 


 
 
Powered By Sangraha 9.0