डॉक्टरांचे ऐका रे ! पोलीसी खाक्या दाखवल्यावर २४ तासांत मौलवीचे शब्द मागे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2020
Total Views |
SAAD Mohammad_1 &nbs


नवी दिल्ली : दिल्लीतील मरकज येथे देश-विदेशातील मुस्लीमांना एकत्र करून मशिदींना खुले करण्याची शिकवण देणाऱ्या मौलवी सादने २४ तासांत आपले शब्द फिरवले आहेत. दरम्यान, पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे मौलाना सादचे धाबे दणाणले आहेत. दिल्ली मरकज युट्यूब चॅनलवर हा ऑडिओ अपलोड करण्यात आला आहे.
या ऑडिओत तो म्हणतो कि, "डॉक्टरांना सहकार्य करा, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपल्याला बेजाबादारपणे वागणे चांगले नाही, असे करणे हे मुस्लीमांचे महत्वाचे कर्तव्य आहे. त्यामुळे उपचार करून घ्या, असे आवाहन त्याने केले आहे." 
यापूर्वी बुधवारी साद मोहम्मद याने जमातच्या इंतजामिया कमिटीच्या सदस्यांना आपला ऑडिओ पाठवला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आता दिल्लीतच थांबलो आहे. इथे मला विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. देशभरातील नागरिकांना मी आवाहन करतो कि, त्यांनी इथेच थांबावे.
दरम्यान, साद कुठे थांबला आहे. त्याला कुठे विलगीकरण कक्षात ठेवले आहे याबद्दल कुणालाच माहिती नाही. पोलीसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तसेच फरारही घोषित करण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@