'तबलीग-ए-जमात' प्रकरण : पुण्यातील ३६ 'ते' मुस्लीम अजूनही मोकाटच

02 Apr 2020 19:24:06
Pune_1  H x W:





पुणे : दिल्लीतील 'तब्लीग-ए-जमात'च्या कार्यक्रमात पुण्यातून सहभागी झालेल्या ३६ जणांचा शोध अद्याप लागलेला नसल्याने त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कोरोना संक्रमणाचा धोका कायम आहे. प्रशासनाने कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून या सर्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, सावध झालेल्या या इसमांनी आपले सिमकार्ड बदलल्याची शक्यता पुणे जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. 
तबलीग-ए-जमातच्या कार्यक्रमासाठी दिल्लीत दाखल होणाऱ्या मुस्लीमांपैकी पुणे विभागात १८२ जणांची यादी प्रशासनाच्या हाती लागली होती. त्यातील पुण्यात १०६ जण तर सातारा, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यात उर्वरित असा सहभाग होता. पुणे प्रशासनाने या पैकी ७० जणांना क्वारंटाईल केले आहे. मात्र, उर्वरित जणांचा तपास अद्याप न लागल्याने परिस्थिती चिंताजनक आहे.

पोलीसांचा तपास वेगाने सुरू असून पुणे विभागातील १८२ पैकी ५१ जण हे बाहेरच्या राज्यात असण्याची किंवा त्यांनी फोन, सिमकार्ड बदलल्याचीही शक्यता आहे. दरम्यान, पुण्यात गुरुवारी तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण ८० वर पोहोचली आहे.
Powered By Sangraha 9.0