तबलिग-ए-जमात : जळगावातील १३ जणांचा दिल्ली कार्यक्रमात सह्भाग

02 Apr 2020 20:12:18
जळगाव_1  H x W:
 
 
 
नाशिक : नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिकी जमात परिषदेत जळगाव जिल्ह्यातील १३ जणांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. या सर्व सहभागी नागरिकांचा शोध पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आला असून त्यांची येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. या तपासणी अंती कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे समोर आले आहे. दिल्ली प्रशासनाच्या वतीने जळगाव जिल्हा पोलीस दलास येथील सहभागी नागरिकांची माहिती कळविण्यात आली होती. दरम्यान , पोलिसांनी केलेल्या चौकशीत या १३ जणांपैकी २ जण दिली येथेच असल्याचे देखील समजत आहे. दरम्यान , अशाप्रकारे या संमेलनातून जिल्ह्यात परतलेल्या तसेच त्याबाबतची माहिती लपविणाऱ्या नागरिकांच्या चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.


दरम्यान. काल दि. २ रोजी शहरातील सालार नगर परिसरातील व्यक्ती कोरोनाचा पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. दुपारी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हा रूग्ण सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल झाला तेव्हाच त्याची प्रकृती अतिशय खालावली होती. कोरोना पॉझिटीव्ह झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. आज सकाळी त्याची प्रकृती अजून गंभीर बनल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास त्याने शेवटचा श्वायस घेतल्याचे वृत्त आहे.
Powered By Sangraha 9.0