सुवर्ण मंदिरातील 'हजूरी रागी' निर्मल सिंग यांचा मृत्यू

02 Apr 2020 13:08:30

nirmal singh_1  

कोरोनामुळे देशाने गमावला पद्मश्री पुरस्कार विजेता

अमृतसर : सुवर्ण मंदिराचे माजी रागी (कीर्तनकार) पद्मश्री निर्मल खालसा यांचा कोरोना संक्रमनामुळे गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांना मंगळवारी अमृतसरचे गुरु नानक देव हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले होते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये शिफ्ट केले गेले. त्यांच्या संपर्कात आलेल्या आई, पत्नी, दोन्ही मुली, एक मुलगा, एक ड्रायव्हर आणि दोन सेवक, दोन साथीदार रोग्यांसह कुटुंबातील दोन अनेक सदस्यांना आयसोलेशनमध्ये भरती केले गेले आहे. यांच्याव्यतिरिक्त एक साथीदार रागीच्या कुटुंबातील पाच सदस्यांनादेखील क्वारंटाईन केले गेले आहे. या सर्वांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले गेले आहे. प्रशासनाने संपूर्ण भाग सील केला आहे.

निर्मल रागी कसे संक्रमित झाले मात्र सध्या हे अद्याप कळाले नाही. तीन मार्चला त्यांच्या घरी अमेरिकेहून काही पाहुणे आले होते. नोव्हेंबरमध्ये निर्मल रागी हे ब्रिटन गेल्याचेही कळाले होते. अमृतसरचे सिव्हिल सर्जन डॉ. प्रभदीप कौर जौहल यांनी सांगितले की, त्यांना अस्थमाही होत. अशात संक्रमण वेगाने पसरते. १९ मार्चला निर्मल सिंह कीर्तन समागमासाठी चंदीगडलादेखील गेले होते. जेथे १०० लोकांचे गॅदरिंग झाले होते. २० मार्चला अमृतसरला परतले आणि त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांचे चेकअप झाले होते.
Powered By Sangraha 9.0