भारतातच नाही जगभरात आहेत, माथेफिरू मौलवी

02 Apr 2020 15:13:15
Maulavi Iran_1  
 
 
मिलान - कोरोनाशी लढताना जगातील मोठमोठ्या डॉक्टरांनी जिथे गुडघे टेकले आहेत. तिथेच ईराणहून आता एक हास्यास्पद बाब उघड झाली आहे. कोरोनामुळे वाढत्या मृत्यूच्या संख्येत काही मौलवी आता अत्तर आणि फुलांच्या तेलाद्वारे हकीमी इलाज करत आहेत. ईराणी मौलवींच्या या मूर्खपणामुळे मृतांच्या आकड्यात आणखी भर पडत आहे. तर काही इस्लामिक प्रचारकांनी याविरोधात आवाजही उठवला आहे.
 
 
एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'काही ठिकाणी मौलवींनी धर्मातील लोकांना केलेल्या आवाहनाचे कौतूक केले जात होते. मात्र, आता या नव्या प्रकारामुळे ईराणमध्ये पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोरोनावर उपचार म्हणून हकीमी उपचार मौलवी करत असल्याचा आरोप मौलवींवर करण्यात आला आहे.'
ईराणमध्ये शिया मुस्लीमांच्या सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या एका शहरातून कोरोनाबाधित आढळला होता. याची घोषणा १९ फेब्रुवारी रोजी अधिकृतरित्या करण्यात आली, सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, काही कट्टरपंथींनी लॉकडाऊनला नकार दिला.
 
 
इराणमध्ये ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका व्हायरल व्हीडिओत दाखवण्यात आले आहे कि, एक मौलवी रस्त्यावर उतरून गाड्यांवर फवारणी करत आहे. याद्वारे कोरोनाच्या जंतूंचा नाश होत असल्याचा दावाही त्याने केला. जिथे डॉक्टरांनी गुडघे टेकले आहेत. तिथे काही मौलवी त्यांच्याकडच्या औषधाने रुग्ण बरे होतील, असा दावा करत आहे.
 
 
२१ मार्च रोजी मौलवी मोर्तेजा कोहंसल याने उत्तर ईराणच्या गिलान प्रांतात अंजली स्थित एका रुग्णालयात प्रवेश केला. रुग्णालयात बाहेरील कुठल्याही व्यक्तीला रुग्णावर उपचार करत येत नाहीत, मात्र, त्याने सोबत आणलेले अत्तर रुग्णांच्या नाकावर लावण्यास सुरुवात केली. यावेळी ना कोणते सोशल डिस्टंसिंग पाळण्यात आले न क्वारंटाईल कक्षातील कुठलेही नियम. त्याने हे उपचार केल्यावर डॉक्टर आणि मोहसिन शरीफ नामक रुग्णासोबत एक फोटो काढला. हे वृत्त तिथल्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये देण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी शरीफचा मृत्यू झाला, तसेच तिथे असलेला त्याच्या मित्राचाही मृत्यू झाला.
 
 
स्थानिक प्रशासनाने मोर्तेजा कोहंसलच्या अटकेचे वॉरंट काढले. आता तो फरार आहे. इस्लामिक हकीमी इलाजाचा प्रचार करत विज्ञानाला आव्हान या मौलवींनी केले आहे. यापूर्वी ईराणमध्येच मेथनॉल पिल्याने कोरोनाचा इलाज होतो, अशी अफवा उठली होती. त्यावर विश्वास ठेवत अनेकांनी तसे केले. यामुळे ३००हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
Powered By Sangraha 9.0