मी २ वर्षाचा पगार दिला, तुम्ही काय केलं ? : गौतमचा गंभीर सवाल

    02-Apr-2020
Total Views |

gambhir_1  H x
 
 
नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढा देण्यासःती अनेक जणांनी पुढे येत केंद्र तसेच राज्य सरकारला मदत केली आहे. अशामध्ये क्रीडा क्षेत्रातून अनेक खेळाडूंनी पंतप्रधान सहायता निधीमध्ये आपले योगदान दिले आहे. दिल्लीतील भाजपचा खासदार आणि भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरनेदेखील पंतप्रधान निधी तसेच मुख्यमंत्री निधी आणि खासदार फंडातून मोठी मदत केली आहे.
 
 
 
 
गंभीरने ट्विट केले आहे की, “लोक विचारतात देशाने त्यांच्यासाठी काय केले. पण, त्यांनी देशासाठी काय केले, हा खरा प्रश्न आहे. मी माझा दोन वर्षांचा पगार पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा केला आहे. तुम्हीही पुढे येऊन मदत करा.” तत्पूर्वी, गंभीरने कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी मदतीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आपल्या खासदार फंडातून दिल्ली सरकारला ५० लाखांची मदत करणाऱ्या गंभीरने आणखी एक कोटींची मदत जाहीर केली आहे. शिवाय त्याने एक महिन्याचा पगारही दान करण्याचा निर्णय घेतला आहे.