बीडच्या ९ 'तबलिगीं'पैकी ७ जणांचा शोध सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2020
Total Views |
beed_1  H x W:

बीड : राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'तबलिगी' जमातीच्या धार्मिक संमेलनात अर्थात 'मरकज'मध्ये देशविदेशातून मुस्लीम धर्मप्रसारक सामील झाले होते. महाराष्ट्रातही त्यांची संख्या मोठी असून जिल्हानिहाय त्यांचा कसून शोध सुरु आहे.


बीड जिल्ह्यामधील एकूण ९ मुस्लीम नागरिक या मरकजमध्ये सामील झाले होते. त्यापैकी २ जण बीड जिल्ह्यात परतले असून त्या २ कोरोना संशयितांना आरोग्य विभागाने विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. इतर सात जणांचा जिल्हा प्रशासन शोध घेत असून त्यांचा थांगपत्ता प्रशासनाला लागल्याची माहिती आहे.


विलगीकरण कक्षात असलेल्या २ जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे. उर्वरित ७ जणांचा प्रशासन कसोशीने शोध घेत असून त्यांची माहिती मिळताच योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@