तबलिगी जमातच्या कार्यक्रमातील २५जण ठाण्यात सापडले

02 Apr 2020 14:01:02

Tablig e Jamat _1 &n
मुंबई : दिल्लीतील निजामुद्दीन मॅकजरमधील तबलिगी जमातीच्या धार्मिक सोहळ्यातून कोरोनाची लागण झाल्याचे धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. या कार्यक्रमातील लोक देशातील वेगवेगळ्या राज्यात गेले असल्याने यांना शोधण्याचे मोठे आव्हान प्रत्येक राज्यासमोर उभे राहिले आहे. हे सर्वच्या सर्व २५जण मुंब्रा येथील एका मशिदीत थांबले होते. अशी माहिती मिळते. ठाण्यात आज कार्यक्रमात सहभागी झालेले २५जण सापडले आहेत. यातील तब्बल २१ जण विदेशी नागरिक आहेत. यात आठ मलेशियन आणि १३ बांगलादेशी आहेत. तर बाकी सर्वजण आसाममधील आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या या २५ लोकांचे विलगीकरण करण्यात आले असून त्यांच्यात करोनाची लक्षणे आहेत की नाही? याचा तपास केला जात आहे, असे या टीमचे एक अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी सांगितले. याशिवाय किरगिस्तान आणि फिलीपाइन्सच्या काही नागरिकांनी मुंब्र्याला भेट दिली होती, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हे २५ लोक कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, या सर्वांचा तपास करण्यात येत आहे. या लोकांचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0