कोरोनामुक्त रुग्णांना पुन्हा लागण होऊ शकते : WHO

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2020
Total Views |
COVID-19_1  H x



जागतिक आरोग्य संघटनेचा प्लाझ्मा थेरेपीवरही प्रश्न

जेन्हेवा : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांसंदर्भात चिंता व्यक्त केली असून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये कमी असलेल्या रोग प्रतिकार शक्तीमुळे विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. संघटेनेचे वरिष्ठ अधिकारी माईक रायन यांच्या मते, 'रुग्णाच्या शरिरात असणारे एन्टीबॉडीज नव्याने होणाऱ्या कोरोना विषाणूचे संक्रमण रोखू शकते की, नाही याबद्दल कुठलेही प्रमाण नाही. जर एन्टीबॉडीज प्रभावी आहेत, तरीही अधिक लोकांमध्ये विकसित झालेले नाहीत.
 
 
 
देशांना डब्ल्यूएचओची सूचना
 
विविध देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या एंटीबॉडी टेस्टची तयारी करण्यात आली होती, अशा देशांना जागतिक आरोग्य संघटनेने सूचना दिली आहे. बऱ्या झालेल्या रुग्णाला पुन्हा कोरोना होऊ शकत नाही, याचे कुठलेही प्रमाण नाही. ब्रिटिश सरकारने कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या एन्टीबॉडीजचा स्तर जाणून घेण्यासाठी एकूण ३५ लाख सीरोलॉजिकल टेस्ट केले आहेत.अमेरिकेच्या संक्रमण रोग विशेषज्ञ डॉ. मारिया वेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, असे बरेचसे देश आहेत. ज्यांनी सीरोलॉजिकल टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, माणसाच्या शरिरात अशी कुठलेही रोगप्रतिकारक शक्ती नाही, ज्यामुळे कोरोना पुन्हा होऊ शकणार नाही, याचा धोका टाळता येणे कठीण आहे. सीरोलॉजिकल टेस्ट केवळ शरिरातील एन्टीबॉडीजचे स्तर सांगू शकते. याचा अर्थ असा नव्हे कि, विषाणूच्या संक्रमणापासून ते सुरक्षित असेलच.
 
 
 
 
एन्टीबॉडीज म्हणजे काय ?
 
प्रथिनांसारखी तयार झालेल्या रोगप्रतिकार करणाऱ्या पेशी आहेत. ज्याला बी-लिम्फोसाइट म्हटले जाते. जेव्हा शरीरात कुठल्याही बाह्य संक्रमणाचा धोका वाढू लागतो, त्यामुळे या पेक्षी सक्रीय होतात. विषाणूंपासून पोहोचवले जाणाऱ्या विषारी घटकांचा नायानाट करण्याचे काम या पेशी करतात. या प्रकारे रोग पुर्णपणे निष्क्रीय होऊन जातो. कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातही अशाच प्रकारे एन्टीबॉडीज तयार झालेल्या आहेत. जेव्हा रक्तातून या दुसऱ्या संक्रमित रुग्णाला दिल्या गेल्या तर रुग्ण कोरोनापासून वाचू शकतो, अशी शक्यता उपचार करणारे डॉक्टर व्यक्त करतात.
 
 
 
 
जगभरात काय तयारी सुरू आहे ?
 
भारतासह अन्य देशांमध्येही कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या एन्टीबॉडीज दुसऱ्या रुग्णांना देण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या एन्टीबॉडीजचा वापर प्लाझ्मा थेरेपीद्वारे केला जात आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील एन्टीबॉडीज कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडून उपचार केले जात आहेत. मात्र, हे कितपत परिणामकारक ठरेल यावरच जागतिक आरोग्य संघटनेने प्रश्न उपस्थित केला आहे.'
 
 
 
कसा होतो वापर
 
 
कोरोनाचे बरे झालेल्या रुग्णांच्या शरिरातील रोग प्रतिकार करणाऱ्या प्रणालीद्वारे एन्टीबॉडीज तयार होतात. हे शरीरातील रक्ताच्या प्लाझ्मामध्ये असतात. रुग्णाच्या रक्तातून प्लाझ्मा वेगळे केले जाते. त्यानंतर एन्टीबॉडीज काढले जातात. त्यानंतर रुग्णाच्या शरीरात पोहोचवले जातात. याला प्लाझ्मा डिराइव्ड थेरेपी म्हटले जाते. त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.







@@AUTHORINFO_V1@@