विद्वत्तेचा गांजा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2020
Total Views |


arundhati roy_1 &nbs


सरकार कोरोना महामारीचा हिटलरने ज्यूंचा केला त्याप्रमाणे मुस्लिमांच्या नरसंहारासाठी वापर करत असल्याचे अरुंधती रॉय यांनी म्हटले. विद्वत्तेचा गांजा मारला की, राष्ट्र आणि समाजाच्या एकतेला सुरुंग लावण्याचा आपल्याला परवाना मिळाल्याच्या थाटात त्या वावरत असतात. आताही त्यांनी तेच केले आणि आपले आयुष्य देशविघातक विकृतीच्या रसदीवरच पोसल्याचे दाखवून दिले.


बुद्धिवादाच्या धुंदीत स्वदेशद्वेषाचा चिखल उडवत इतस्ततः बागडणार्‍या इंग्रजी लेखिका अरुंधती रॉय यांनी पुन्हा एकदा गरळ ओकले.
डीडब्ल्यू न्यूजया जर्मन वृत्तसंस्थेला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अरुंधती रॉय यांनी भारताची पुरती बदनामी होईल, याची दक्षता घेतली. अवघे जग कोरोनाविषाणूच्या साथीशी दोन हात करत असताना अरुंधती रॉय यांना आपल्या मना-मेंदूतली जातीयवादी घाण बाहेर काढण्याची ही सुसंधी असल्याचे वाटले आणि त्या बरळू लागल्या. भारतातील केंद्र सरकार कोरोना महामारीचा हिटलरने ज्यूंचा केला त्याप्रमाणे मुस्लिमांच्या नरसंहारासाठी वापर करत असल्याचे अरुंधती रॉय यांनी म्हटले. इतकेच नव्हे तर भारतातील विद्यमान सत्ताधार्‍यांची या सगळ्यामागे हिंदूराष्ट्रच्या उभारणीची योजना असल्याचेही त्या म्हणाल्या.



वस्तुतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आपल्यापाशी असलेल्या सर्व साधनांनिशी कोरोनाविरोधात नेटाने लढत आहे. सर्व राज्य सरकारे आणि वैद्यकीय संस्था
, प्रयोगशाळा, रुग्णालयांशीही केंद्र सरकारचा उत्तम समन्वय असून आर्थिक आघाडीवर सरकारने योग्य ती पावले उचलली. अर्थातच केंद्र सरकारने यापैकी कोणत्याही वेळी विशिष्ट धर्माचा वा जातीचा उल्लेख केलेला नाही. तरीही अरुंधती रॉयसारख्यांना केंद्र सरकारची कृती मुस्लीमविरोधीच नव्हे तर त्यांच्या वंशसंहारासाठी केलेली वाटते, हा त्यांना नेमक्या कोणत्या व्याधीने ग्रासले, त्याची साक्ष देणारा दाखला ठरतो.



२००२ 
पासून अरुंधती रॉय यांच्यासह तमाम छद्मपुरोगामी, छद्मधर्मनिरपेक्षतावादी व छद्मउदारमतवादी कंपूने नरेंद्र मोदींच्या प्रतिमाहननाचा उद्योग केला. परंतु, गेल्या १८वर्षात मोदींची प्रतिमा अधिकाधिक उंचावत गेली व ते दोनवेळा अफाट बहुमताने पंतप्रधानपदी विराजमान झाले. आता तर अमेरिका, ब्राझील व संयुक्त राष्ट्रही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदींची प्रशंसा करताना दिसतात. कोरोना महामारीच्या काळात भारत सरकार उत्तम निर्णय घेत असल्याचे जागतिक संस्थाही म्हणत आहेत. अशा परिस्थितीत अरुंधती रॉयसारख्यांची पोटदुखी वाढणार नाही तर काय होणार? तोच मोदीद्वेषाचा गळू पुन्हा एकदा ठसठसला आणि अरुंधती रॉय केंद्र सरकारवर निराधार आरोप करू लागल्या.



तथापि
, अरुंधती रॉय यांची बेतालपणे बडबडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. कोरोनाच्या साथीत नेमके हिंदू-मुस्लीम करण्यासाठी बिळातून बाहेर आलेल्या अरुंधती रॉय यांनी याआधीही विखारी वक्तव्ये आणि कृत्ये केलेलीच आहेत. विद्वत्तेचा गांजा मारला की, राष्ट्र आणि समाजाच्या एकतेला सुरुंग लावण्याचा आपल्याला परवाना मिळाल्याच्या थाटात त्या वावरत असतात. म्हणूनच कधी माओवाद्यांच्या, नक्षलावाद्यांच्या प्रेमाचा उमाळा अरुंधती रॉय यांना येताना दिसतो. तर कधी त्या जम्मू-काश्मिरातील फुटीरतावाद्यांची, दहशतवाद्यांची तळी उचलत त्यांना मासूम ठरवतात. कधी पाकिस्तानी लष्कराला स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र देतात आणि स्वदेशाच्या लष्कराला बलात्कारी ठरवतात, तर कधी संविधानिक संस्था-प्रणाली, ‘सीएए’, ‘एनआरसी’, ‘एनपीआरविरोधात कृती करण्याची चिथावणी देतात.



देशातील राजकीय-सामाजिक वातावरण नासवण्याचा विडा उचललेल्या अरुंधती रॉय गोवा मुक्ती संघर्षाला सर्व भारतीय सैन्याचे ख्रिश्चनांविरोधातील षड्यंत्र असल्याचेही म्हणतात. एकूणच अरुंधती रॉय यांची कथनी पाहता त्यांचे आयुष्य देशविघातक विकृतीच्या रसदीवरच पोसल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे एरवी हिंदू-मुस्लीम रंग देऊ नका
, असे कर्कश आवाजात ओरडणार्‍या कंपूलाही अरुंधती रॉय यांच्या शब्दांत कुठेही काही वावगे दिसत नाही. उलट अरुंधती रॉय यांच्या पंगतीत बसून तेच हाडूक चघळण्याचा कारनामा ही मंडळी करत असतात. नुकतेच भारताची कुस्तीपटू बबिता फोगट हिने तबलिगीजमातीच्या सदस्यांनी कोरोना प्रसाराला लावलेल्या हातभाराविरोधात ट्विट केले. बबिताच्या ट्विटनंतर लिबरल टोळक्याने एकाएकी तिच्याविरोधात आघाडी उघडली. बबिताचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी त्यांनी केली. अर्थातच या सर्वांचे म्हणणे बबिताने जातीयवादी किंवा सांप्रदायीक विधान केले, असे होते. पण मग अरुंधती रॉय यांनी तरी काय केले आहे? बबिता फोगटच्या म्हणण्याला सत्य आणि तथ्याचा आधार तरी होता, पण अरुंधती रॉय यांच्या विधानाला ना शेंडा ना बुडखा! तरीही कोणी पुरोगामी वा धर्मनिरपेक्षतावादी त्याविरोधात चकार शब्दही काढताना दिसत नाही. कारण तेच, आमच्या कळपातल्या अरुंधती रॉय यांनी देशाला, मोदींना बदनाम करण्यासाठी वक्तव्य केले ना, मग आम्हीही त्याला साथ देणारच, असा या कंपूचा पवित्रा असावा. दुटप्पीपणा म्हणजे नेमके काय, हे यातूनच दिसून येते.




दरम्यान
, भारतातील कोरोनाप्रसारात सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावली ती दिल्लीतील तबलिगीजमातीच्या मरकजमध्ये सामील झालेल्यांनी. परंतु, ‘तबलिगीजमातीच्या सदस्यांवरही वैद्यकीय उपचार करण्यात भारतातील डॉक्टरांनी वा रुग्णालयांनी नकार दिला नाही. उलट त्यांनाही रुग्णालयात दाखल करुन घेतले आणि जे लपून बसले होते त्यांना शोधण्यासाठी वैद्यकीय, पोलीस पथके रवाना झाली. तबलिगीजमातीच्या सदस्यांना शोधून त्यांच्यावर उपचार करता यावेत, अशीच यामागची भूमिका होती. पण तबलिगीजमातीच्या सदस्यांनी इथेही आपले विघातक रंग दाखवले. रुगणालयात दाखल केलेल्यांनी डॉक्टर, परिचारिकांवर थुंकण्याचे काम केले तर अनेक ठिकाणी वैद्यकीय पथक व पोलिसांवरही हल्ले केले गेले.



तबलिगीजमातींच्या सदस्यांचा यामागे नेमका कोणाचा संहार करण्याचा उद्देश होता? अरुंधती रॉय यांना हा प्रश्न कधी पडला का? हा प्रश्न विचारावेसे वाटले का? शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत  हजार, २९१ रुग्ण तबलिगीअसल्याचे म्हटले होते. अजूनही कितीतरी तबलिगीजमातीचे सदस्य समोर येत नाहीत, त्यांना कोणीतरी दडून बसण्यासाठी पुरेपूर साहाय्य करत आहे. सरकार मात्र त्यांच्यावर उपचार करता यावे व तेही बरे व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहे. देशभरातली परिस्थिती अशाप्रकारची असूनही अरुंधती रॉय सरकारलाच दुषणे देतात, बेछूट आरोप करतात. हे डोके फिरल्याचे लक्षण नाही तर काय? खरे म्हणजे अरुंधती रॉयसारख्यांनी मुस्लिमांचे प्रबोधन करुन त्यांना या संकटकाळात आरोग्य व पोलीस कर्मचार्‍यांना सहकार्य करा, असे आवाहन करायला हवे होते. पण ते न करता त्यांनी मुस्लिमांच्या मनात भीती कालवण्याचेच काम केले. मुस्लिमांना डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही त्या म्हणाल्या. ही सरळसरळ भारतविरोधी भूमिका तर आहेच पण मुस्लिमांना सरकारविरोधी भडकावण्याचीही कृती आहे. त्यांचा यामागचा हेतू देशात अराजक माजवण्याचाच आहे, पण अरुंधती रॉय पांडित्याच्या अफूत कितीही चूर झाल्या तरी त्यांचे मनोरथ कधीही पूर्ण होणार नाहीत, हे त्यांनी कायमचे लक्षात ठेवावे.


@@AUTHORINFO_V1@@