नगरमध्ये २४ परदेशी तबलीगींना अटक

18 Apr 2020 12:37:11

tabalighi_1  H
अहमदनगर : दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजला हजेरी लावल्यानंतर नगरमध्ये आलेल्या परदेशी नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये २४ परदेशी तबलीगींना अटक करण्यात आली आहे. तसेच यांना मदत करणाऱ्या पाच स्थानिक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे आहेत.
 
दरम्यान, हे तबलिगी भारतात पर्यटन व्हिसावर आले आहेत. मात्र, असे असतानाही या व्हिसाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. नगरमधील भिंगार, जामखेड, नेवासा पोलिस स्टेशनमध्ये हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी सिव्हिलमध्ये उपचार घेत असलेले पाच परदेशी नागरिक सोडून अन्य २९ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात पाच भारतीयांचा समावेश आहे. ते भाषांतरकार म्हणून त्यांच्यासोबत होते.
 
मरकजहून आलेल्या या परदेशी नागरिकांच्या संपर्कात कोण कोण आले, याचीही माहिती घेण्यात येत आहे. तसेच स्थानिक पाच नागरिकांची चौकशीही करण्यात येत आहे. दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात मरकजहून दाखल झालेल्या या परदेशी नागरिकांची चौकशी करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0