रंगोली चंडेलचे सोशल मिडिया अकाऊंट ‘ट्विटर’कडून निलंबित!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2020
Total Views |

Rangoli chandel_1 &n


मुरादाबाद ट्विट प्रकरणी ‘ट्विटर’कडून कारवाई; रंगोलीचा आरोप


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतची बहीण रंगोली चंडेल तिच्या बेधडक बोलण्यामुळे ओळखली जाते. ती प्रत्येक विषयावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला अभिप्राय देत राहते, आपले विचार व्यक्त करत असते. दरम्यान, रंगोलीने अशी अनेक ट्विट्स केले होते ज्यामुळे वादंग माजला होता. त्यानंतर ट्विटरने तिचे अकाऊंट निलंबित करण्याचा इशाराही दिला मात्र रंगोलीला काही फरक पडला नाही. आता तिने मुरादाबादमध्ये झालेल्या आरोग्य सेवा कर्मचार्‍यांवरील हल्ल्याबाबत द्वेषयुक्त ट्विट केले होते. यामुळे तिचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले आहे.


मुरादाबादमध्ये झालेल्या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना, रंगोलीने वादग्रस्त ट्विट केले होते. ती म्हणाली होती, ‘कोरोना व्हायरसमुळे जमातीमधील एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय पथक त्यांच्या कुटूंबाची तपासणी करण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि दगडफेक करण्यात आली.’ त्यानंतर पुढील ओळींमध्ये तिने आपला राग आणि द्वेष व्यक्त केला आहे.


ती पुढे म्हणते, ‘सर्व 'जमाती' मुस्लिमांना एका ओळीत उभे केले पाहिजे आणि गोळ्या घालून ठार केले गेले पाहिजे. भविष्यात एखाद्याने आपल्याला 'नाझी' म्हणून संबोधले तरी याची पर्वा नाही. अशा खोट्या दिखाव्यापेक्षा आयुष्य महत्त्वाचे आहे.’ रंगोलीच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका होती. बॉलिवूड फिल्म दिग्दर्शक रीमा कागती यांनी रंगोली चंदेलच्या ट्विटवर मुंबई पोलिसांना टॅग करत, कारवाईची मागणी केली होती. अभिनेत्री कुब्रा सैतही रीमाच्या समर्थनार्थ पुढे आली होती आणि तिने ट्विटरवर आपण रंगोलीला ब्लॉक केल्याचे सांगितले.


आता ट्विटरने तिचे खाते बंद करून टाकले आहे. या कारवाईबद्दल मत व्यक्त करताना रंगोली म्हणते, 'हा पूर्णपणे पक्षपात आहे. ट्विटर एक अमेरिकन प्लॅटफॉर्म आहे व तो भारतविरोधी आहे. लोक हिंदू देव-देवता आणि पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांना अतिरेकी म्हणुन त्यांची चेष्टा करू शकतात, परंतु आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक केल्याबद्दल लिहू शकत नाहीत. असे केल्याने त्यांचे खाते निलंबित केले जाते.


दरम्यान, यापूर्वीही रंगोलीच्या ट्विटमुळे रीमा कागती यांना त्रास झाला होता व त्यांनी तिचे खाते निलंबित करण्याची सूचना दिली होती. याधीही रंगोलीने अनेकवेळा एका विशिष्ट समुदायावर निशाणा साधून वाद ओढवून घेतला होता. चित्रपट सृष्टीमधील लोकांवर टीका अथवा भाष्य केल्यानेही अनेक वाद निर्माण झाले होते.
@@AUTHORINFO_V1@@