आयपीएल स्थगित ; श्रीलंकेकडून बीसीसीआयला ऑफर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2020
Total Views |

ipl 2020_1  H x
नवी दिल्ली : बीसीसीआयने अखेर आयपीएल २०२०वर निर्णय घेत अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याची घोषणा केली. कोरोनाचे थैमान आणि भारतामध्ये लॉकडाऊन असल्याकारणाने बीसीसीआयने हा निर्णय घेतला. मात्र आता त्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला एक ऑफर दिली आहे. ‘आयपीएल २०२०चे आयोजन श्रीलंकेत करावे’ अशा प्रकारची ऑफर श्रीलंकेकडून बीसीसीआयला देण्यात आली आहे.
 
 
“श्रीलंका भारताआधी या परिस्थितीतून बाहेर पडेल असे चित्र सध्या श्रीलंकेत दिसत आहे. असे झाले तर आयपीएल आम्ही श्रीलंकेत भरवू शकतो. यावर बीसीसीआयने विचार करावा, माही वात पाहू.” असे मत श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मीसिल्वा यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केले. मध्यंतरी भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर काळात स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र अधिकृतरीत्या बीसीसीआयने यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@