कोरोनाविरोधात लढाईसाठी डीआरडीओची नवीन उत्पादने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2020
Total Views |

DRDO_1  H x W:





नवी दिल्ली :
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्यावतीने कोरोना विरुद्ध लढ्याला बळ देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाच्या आणि अनुभवाच्या मदतीने ही संस्था शस्त्रास्त्रे तसेच इतर अनेक आवश्यक उत्पादने विकसित करीत आहे. सद्यपरिस्थिती लक्षात घेता आवश्यकतेप्रमाणे उत्पादनात बदल घडवून नवीन अधिक प्रभावी ठरतील अशी उत्पादने विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. कोरोना संसर्ग सार्वजनिक ठिकाणांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाढू शकतो, हे लक्षात घेवून सार्वजनिक ठिकाणांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यसाठी डीआरडीओने दोन नवीन उत्पादने विकसित केली आहेत.



कृत्रिम धुक्याद्वारे निर्जंतुकीकरण फवारणी करणारे स्वयंचलित उपकरण 


सीएफईईएस म्हणजेच सेंटर फॉर फायर एक्सप्लोझिव्ह अँड एन्व्हायर्नमेंट सेफ्टी या दिल्लीच्या संस्थेने अग्निरोधनासाठी धुके तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वयंचलित निर्जंतुकीकरण रसायनाची फवारणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राच्या मदतीने इमारती, कार्यालये यामध्ये प्रवेश करताना हात सॅनिटाईझ करणे सोपे होईल. या द्रावणामध्ये जलयुक्त धूर तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामुळे हातावर घेतलेले रसायनिक द्रावण उडून जाते. निर्जंतुकीकरणाचे काम होते, मात्र हात धुण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागत नाही.हे यंत्र हाताळण्यासाठी सोईचे आणि लहान आहे. त्याचबरोबर त्यामध्ये भरपूर प्रमाणावर द्रावण भरता येते. आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि दीर्घकाळ काम करणारे हे यंत्र आहे.या यंत्राचा वापर रुग्णालये, मॉल्स, कार्यालयीन इमारती, निवासी इमारती,विमानतळ, मेट्रो, रेल्वे आणि बस स्थानकांवर तसेच इतर आस्थापनांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आणि तिथून बाहेर पडताना करता येईल. तसेच विलगीकरण केंद्रांमध्येही हे यंत्र उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे.


युव्ही सी बॉक्स  आणि हातात पकडण्याचे अतिनील उपकरण


डीआयपीएएस म्हणजेच डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फिजियोलॉजी अँड अलाइड सायन्स तसेच आयएनएमएएस म्हणजेच न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स, दिल्लीची डीआरडीओ प्रयोगशाळा यांनी अतिनील स्वच्छता कक्ष आणि हातात पकडण्याचे अतिनील उपकरण तयार केले आहे. या उपकरणामध्ये वेव्हलेंथ २५४नॅनोमीटर्सच्या क्षमतेचे अतिनील किरण असतात. ‘अतिनील-सी’मधून अगदी कमी कालावधीसाठी परंतु जास्त ऊर्जावान वेव्हलेंथचे प्रकाश किरण बाहेर पडतात. या किरणांमुळे कोरोनाच्या च्या विषाणूंमधली जनुकीय क्षमता-सामुग्री नष्ट होण्यास मदत होते.‘अतिनील-सी’ खोके हे मोबाईल फोन, टॅब्लेट, पर्स, चलन,ऑफिसच्या फाइल्सचे कव्हर यांच्या निर्जंतुकीकरणासाठी विकसित केले आहे. ‘यूव्हीसी’ दिवा या खोक्यात बसवण्यात आला आहे. यातील प्रकाश किरणांमुळे रोजच्या वापरातल्या सर्व वस्तू एका मिनिटात ‘निर्जंतूक करता येणार आहेत.हातामध्ये धरता येणारे एक यंत्र विकसित करण्यात आले असून त्याच्या मदतीले दोन इंचापेक्षाही कमी अंतरावर असलेल्या गोष्टी निर्जंतूक करता येतात. या यंत्रामध्ये आठ वॅटचा यूव्ही-सी दिवा बसवण्यात आला आहे. यामध्ये खूर्ची,फाइल्स, पोस्टाने आलेली पाकिटे, अन्नाची पाकिटे अशा वस्तूंवर 45 सेकंद यंत्र धरले की, त्या वस्तू निर्जंतूक होतात. या यंत्राचा उपयोग कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी केला गेला तर कोरोनाचा विषाणू प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@