तब्लीगींना लपवणे पडले महागात!

17 Apr 2020 20:21:12

tablig_1  H x W


तब्लीग जमातच्या लोकांना आश्रय देणाऱ्या ११ जणांना कोरोना; याच भागात झालेली पोलिसांवर दगडफेक


उत्तर प्रदेश : दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजशी संबंधित तबलीगी जमातीच्या लोकांना आश्रय देणाऱ्या किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी ११ जणांना कोरोची लागण झाल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील ही घटना आहे. यामध्ये पाच महिला आणि आठ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. गुरुवारी रात्री उशिरा तपास अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली. कोरोनाची लागण झालेले हे ११ जण आधीच कोरोनामुळे धोकादायक घोषित केलेल्या गलशहीद आणि बरवलान भागातील आहे. तर एक कोरोनाबाधित पीरगैब येथे राहणारा आहे.


निजामुद्दीन मरकजशी संबंधित १३ जण मुरादाबाद येथे स्थानिक नागरिकांच्या मदतीने शहरातील वेगवेगळ्या भागात गेल्या ३२ दिवसांपासून राहत असल्याची माहिती उघडकीस आली होती. यानंतर यापैकीच हल्द्वानीला जाणाऱ्या ५ जणांना रामपूर येथे ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना कोरोना झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर शहरातील चार परिसर अति धोकायदायक भाग म्हणून घोषीत करण्यात आले होते. या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते.


तर, तीन दिवसांपूर्वीच यांच्यातील आणखी १४ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तर आज सापडलेले ११ कोरोनाबाधित रुग्ण हे याच लोकांचे नातेवाईक किंवा जवळचे असल्याचे सांगितले जात आहे. सीएमओ डॉ. मिलिंदचंद्र गर्ग यांनी सांगितले की, अतिधोकादायक घोषीत केलेल्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करुन त्यांना क्वारंटाइन करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
Powered By Sangraha 9.0