यानंतर जागतिक क्रीडाविश्व उभारी घेईल का? काय सांगतात तज्ञ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2020
Total Views |

sports_1  H x W
 
 
मुंबई : क्रीडा म्हणजे मनोरंजनाचे एक असे साधन जे प्रेक्षांकांच्या मनात रोमांच उभे करते. पण, कोरोनाच्या या विळख्यामध्ये या क्षेत्राला जबरदस्त भगदाड पडले आहे. किमान २०२० या वर्षामध्ये कुठलीही मोठी स्पर्धा होण्याचे चिन्ह अद्यापतरी दिसेनासे झाले आहेत. कारण फुटबाल, क्रिकेट, बेसबॉल, ऑलिम्पिक हे असे खेळ आहेत जिथे सर्वाधिक संसर्गाचा धोका असतो. विशेष म्हणजे जिथे इटलीमध्ये कोरोणाचा काही संबध नसतानादेखील केवळ एका फुटबॉल सामन्यामुळे तिथे कोरोनाचा प्रसार झाला. अशामध्ये जगभरामध्ये परिस्थिती नियंत्रणात जरी आली तरी सगळीकडेच क्रीडा क्षेत्राला पुन्हा उभे राहण्यासाठी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
 
काही वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू संसर्गामुळे मैदाने, अॅाथलेटिक्स ट्रॅक आणि बंदिस्त कोर्ट बंद ठेवावी लागली आहेत. असे असले तरी क्रीडाक्षेत्रासाठी हा अयोग्य काळ आहे. या वर्षी स्पर्धा आयोजित करणे म्हणजे एखाद्याच्या जीवाशी खेळणे. त्यामुळे क्रीडाक्षेत्राने काही महिने विश्रांती घेण्याची गरज आहे. असा सल्ला देण्यात येत आहे. तसेच पुढील ९ महिने कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे आयोजन करून नये किंवा असे आयोजन झाल्यास विनाप्रेक्षक सामने खेळवण्यात यावे जेणेकरून पुन्हा एकदा कुठल्याही संसर्गजन्य रोगाचा प्रसार होणार नाही, असा सल्ला काही तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
 
 
टेनिसमध्ये महत्त्वाची मनाली जाणारी विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली. पहिल्यांदाच दुसऱ्या महायुद्धानंतर ही स्पर्धा रद्द केली गेली. अद्याप जपानमध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकबद्दल अधिकृतरित्या रद्द करण्यात आली नसली तरीही त्याची तारीख पुढे ढकलण्यात अली आहे. परंतु, जर यावर्षी ही स्पर्धा झाली तर कोणताही देश यामध्ये भाग घेण्यास विचार करेल. कारण, जगभरातून अनेक ठिकाणाहून अॅरथलिटस या स्पर्धेत भाग घेण्यासाठी येतात. बाकी इतर खेळांचा विचार केला तर काही ठिकाणी लॉकडाऊन जरी उठले असले तरी मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी ते ते देश काचकूच नक्कीच करतील. यामुळे आर्थिक दृष्टीनेदेखील जगाला याचा फटका पुढे बसणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@