पाक खेळाडूनेच केला इम्रान खानबाबत गौप्यस्फोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2020
Total Views |

imran khan_1  H
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान आणि क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इम्रान खान यांच्यावर त्यांच्या सोबतीला असलेले क्रिकेटपटू बासित अली यांनी गंभीर आरोप केला आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला की “विश्वचषकानंतर अनुभवी फलंदाज जावेद मियांदादला संघातून बाहेर काढण्याचा कट रचला जात होता. हा कट इम्रान खानशिवाय इतर कोणीही केला नव्हता.” इतकेच नव्हे अली यांनी वसीम अक्रमवर तो फक्त नावाचा कर्णधार असल्याचा आरोप केला. इम्रान सर्व निर्णय घेत होता, असेही अली यांनी म्हटले.
 
माजी पाक क्रिकेटपटू बासित अली यांनी यावेळी सांगितले की, “१९९३ च्या सुमारास मियांदादला संघातून काढून टाकण्याचा कट रचला होता. त्यावेळी माझी तुलना त्याच्याशी होऊ लागली होती, खरे सांगायचे झाले तर मी मियांदादचा एक टक्कासुद्धा नव्हता. मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायचो आणि जेव्हा मियांदादला काढून टाकले गेले तेव्हा मी सहाव्या क्रमांकावर आलो. माझी सरासरी चौथ्या क्रमांकावर ५५ होती, परंतु सहाव्या स्थानावर माझी कामगिरी खालावली. या क्रमांकावर मी फलंदाजी करू शकणार हे त्यांना ठाऊक होते. हे माझ्यासाठी विष होते.”
 
इम्रानला फलंदाजीच्या क्रमवारीत बदल केल्याचा ठपका ठेवत बासित म्हणाले, “मी मोठ्या शॉट्ससाठी ओळखला जात असे. क्रम बदलल्यानंतर माझी फलंदाजी कठीण होती. त्यावेळी वसीम अक्रम कर्णधार होता, पण मियांदादच्या बरखास्तीसाठी जबाबदार माणूस इम्रान खानशिवाय इतर कोणी नव्हता. तो ऑर्डर द्यायचा. प्रत्येकजण त्याच्या इशार्यारवर असायचा.”
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@