नवी दिल्ली : जगभरामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने देशासह पाकिस्तानचा देशही त्रस्त आहे. भारतामध्ये बनत असलेले हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकते असा अंदाज असल्याने सर्वच देशांमध्ये सध्या या औषधाला प्रचंड मागणी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता या औषधासाठी पाकिस्तान या देशाकडूनही मागणी होत आहे. इतर देशांप्रमाणेच पाकिस्तानमध्येही कोरोनाच्या विषाणूचा प्रभाव पडला आहे.
पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६ हजारहून अधिक असून १०० जनांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीदेखील इम्रान खान यांनी पाकिस्तानला मदतीचं आवाहन करणार एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये ते म्हणाले होते की, “आंतरराष्ट्रीय समुदाय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांना माझे आवाहन आहे की, या संकटाच्या काळात पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी काही तरी ठोस मोहीम राबवावी. या मोहिमेअंतर्गत विकसनशील देशांचे कर्ज माफ करण्यात यावे.”