खुशखबर ! भारतीय महिला संघ २०२१ विश्वचषकासाठी पात्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2020
Total Views |

IWCT_1  H x W:
 
 
नवी दिल्ली : संपूर्ण जगासह भारत देशदेखील कोरोनाच्या विळख्यामध्ये अडकला आहे. अशामध्ये भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी एक सुखद बातमी येत आहे. भारतीय महिला संघ हा पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका रद्द झाल्यामुळे २०२१च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. पाकविरुद्ध खेळण्याची भारत सरकारने संघाला परवानगी नाकारली होती. आयसीसीने याबद्दल बुधवारी अधिकृत घोषणा केली आहे.
 
 
 
भारतीय महिलांसह यजमान न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ६ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२१ रोजी न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलिया ३७ गुणांसह अव्वल, इंग्लंड २९ गुणांसह दुसऱ्या, द. आफ्रिका २५ गुणांसह तिसऱ्या तर भारत २३ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. न्यूझीलंड संघाला स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात आला. उर्वरित संघांना पात्रता फेरी खेळून मुख्य स्पर्धेसाठी पात्र व्हावे लागणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@