बिहारमध्ये ५७ तबलिघी अटकेत : टुरिस्ट व्हीसावर धर्मप्रचार

    दिनांक  15-Apr-2020 15:09:48
|
tablighi arrested in biha


 
 
 
लखनऊ : दिल्ली मरकजच्या कार्यक्रमात देशविदेशातून सहभागी झालेल्या तबलिघी जमातींना शोधण्याची मोहिम अद्याप सुरूच आहे. बिहार पोलीसांनी मंगळवारी अशाप्रकारे विभिन्न जिल्ह्यात केलेल्या शोधमोहिमेत एकूण ५७ विदेशी तबलिघींनी अटक करण्यात आली आहे. या ठिकाणच्या मशिदीत लपून बसल्याचा आणि सरकारी निर्देशांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली सर्वांना अटक करण्यात आली आहे. व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचाही त्यांच्यावर आरोप असून सध्या अटकेनंतर सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
 
 
 
पाटणातील वरिष्ठ पोलीस अधिक्षक उपेंद्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, किर्गिस्तानमध्ये राहणारे एकूण १७ जण पर्यटन व्हिसा घेऊन भारतात आले. या नियमांचे उल्लंघन करत त्यांनी धर्मप्रचार सुरू केला. त्यांच्यावर विदेशी अधिनियमनाअंतर्गत प्रार्थमिक गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली आहे. २३ मार्च रोजी पोलीसांनी या सर्वजणांना फुलवारीशरीफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक केली होती. यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. तसेच त्यांना क्वारंटाईलही केले होते. मात्र, कुणीही कोरोना पॉझिटीव्ह आढळलेला नाही.
 
 
 
पर्यटन व्हीसाच्या नियमांवर आलेल्या १० इंडोनेशिया आणि एक मलेशिअन नागरिकांला व्हीसा नियम उल्लंघन केल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. ३१ मार्च रोजी सर्वांची मेडिकल तपासणी करण्यात आली होती. यात कुणीही कोरोना पॉझिटीव्ह आढळलेला नाही. अररिया जिल्ह्यात व्हीसा नियमांच्या उल्लंघनात एकूण १८ विदेशींना अटक करण्यात आली आहे. यात नऊ मलेशियातील आणि एक बांग्लादेशी धर्मप्रचारक होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.