नाशिक - कोरोनाबाधितांची संख्या ४६ वर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2020
Total Views |
Nashik File Pic_1 &n
नाशिक : नाशिक शहरात बुधवारी एका २४ वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले तर मालेगावमध्ये प्राप्त झालेल्या नमुन्यांमध्ये चार नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यात सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण ४६ कोरोना संसर्गित असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.
नाशिक शहरातील रूग्ण हा डॉ. जाकीर हुसेन रूग्णालयात उपचार घेत असून तो नाशिकच्या समाज कल्याण वसतीगृह परिसरातील रहिवासी आहे. तसेच मालेगावच्या वाढलेले ४ रूग्ण हे २५ वर्षीय पुरुष (मोमीनपूरा), २६ वर्षीय महिला (मोमीनपूरा), ५० वर्षीय महिला (नयापूरा), ४० वर्षीय पुरुष (मालेगांव) येथील असल्याचे जिल्हा सामान्य रूग्णालय, नाशिक यांनी कळविले आहे.


नाशिक शहरातील रूग्ण संख्या आता ७ झाली असून मालेगाव मध्ये ३९ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह हेत, जिल्ह्यात एकूण ४६ कोरोना पॉझिटिव्ह असून त्यात धुळे येथे मृत झालेल्या महिलेचा समावेश नाशिक जिल्ह्यातील पॉझिटिव्ह संख्येत न करण्याच्या सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@