आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूवर जुगार खेळण्याची वेळ? पोलिसांनी पकडले रंगेहात

    दिनांक  15-Apr-2020 14:00:46
|

kabaddi player_1 &nb
 
 
सांगली : आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू काशिलिंग आडकेच्या घरात पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ८ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये कबड्डीपटू काशिलिंग आडकेचाही समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. या छाप्यात पोलिसांनी रोख रक्कम, दारूच्या बाटल्यासहित एकून १ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काशिलिंग आडकेच्या राहत्या घरी जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी धडक कारवाई करत आडकेसह त्याच्या मित्रांना रंगेहात पकडले.
 
 
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू तसेच प्रो कबड्डीमध्ये आपली छाप पाडणारा काशिलिंग आडके याला जुगार खेळतांना अटक झाल्याने क्रिडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून काशिलिंग आडकेने क्रिडा क्षेत्रात आपले नाव लौकीक केले होते. सुरूवातील ऊसतोड कामगार म्हणून काम करणाऱ्या काशिलिंग आडकेने अगदी कमी वेळात उकृष्ट कबड्डीपटू म्हणून आपली छाप पाडली होती. विशेषता त्याची हनुमान उडी ही आजही क्रिडाप्रेमीच्या मनात आहे. आपल्या खेळातून क्रिडाप्रेमींच्या मनात अधिराज्य गांजविणाऱ्या काशिलिंगला जुगाराचा अड्डा चालवण्याची काय गरज पडली होती? असा प्रश्न सगळीकडून उपस्थित केला जात आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.