भारतातील वटवाघळांमध्ये आढळला 'हा' कोरोना व्हायरस

15 Apr 2020 15:59:54
bat_1  H x W: 0
 
 
 
 

मानवाला धोका नाही

मुंबई (प्रतिनिधी) - 'भारतीय आयुर्विज्ञान अनुसंशाधन परिषदे'च्या (आयसीएमआर) संशोधनामध्ये भारतीय वटवाघळांमध्ये वेगळ्या प्रकारच्या कोरोना व्हायरसचे विषाणू आढळून आले आहेत. याला 'BtCov' असे नाव देण्यात आले असून तो केवळ वटवघळांमध्ये आढळणारा कोरोना व्हायरस आहे. केरळ, हिमाचल प्रदेश, पद्दुचेरी आणि तामिळनाडू मधून गोळा केलेल्या वटवाघळांच्या नमुन्यांमध्ये हा व्हायरस आढळून आला आहे.
 
 
 
 
 
 
आयसीएमआरच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून वटवाघळांमध्ये निराळ्या प्रकारचे कोरोनाचे विषाणू असल्याचे उघड झाले आहे. मात्र, हे विषाणू माणसांच्या शरीरात संक्रमित होण्याबाबत कोणाताही पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण पुण्याच्या राष्ट्रीय विषाणूशास्त्र परिषदेच्या शास्त्रज्ञांनी दिले आहे. या अभ्यासासाठी केरळ, हिमाचल प्रदेश, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू राज्यामधून वटवाघळांचे २५ नमुने गोळ्या करण्यात आले होते. हे नमुने वटवाघळांमधील कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने पाॅझिटिव्ह आढळले. वटवाघळांमध्ये आढळलेल्या या विषाणूचा मानवी शरीरात आढळणाऱ्या कोविड कोरोना व्हायरसशी काही संबंध नसल्याचे अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे भारतीय वटवाघळे कोविड कोरोना व्हायरसचे संकमक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वटवाघूळ हे अनेक विषाणूंचे वाहक असतात. यापूर्वी केरळ राज्यात वटवाघळांमुळे निपाह व्हायरसचे संक्रमण झाले होते. आ
Powered By Sangraha 9.0