बॉलीवूडच्या किंग खानकडून राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार पीपीई किट्स!

14 Apr 2020 14:23:55

shahrukh khan_1 &nbs



आरोग्यमंत्र्यांनी मानले शाहरुखचे आभार आभार


मुंबई : अभिनेता शाहरुख खानने कोरोना विरोधातील लढाईसाठी आर्थिक सहाय्य करुन आपले योगदान दिले आहे. आता शाहरुखने राज्यातील आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्माचाऱ्यांसाठी २५ हजार पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्वीपमेंट किट्स देऊ केले आहेत. शाहरुखच्या या मदतीसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शाहरुखचे आभार मानले आहेत.


कोरोनाविरोधात लढणाऱ्या मेडिकल टिमला याची मोठी मदत होणार आहे असे लिहित राजेश टोपे यांनी शाहरुखचे आभार मानले आहेत. यापूर्वी शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी त्यांची कार्यालयीन इमारत क्वारंटाइन सेवेसाठी दिली होती.





त्याचबरोबर गेल्याच आठवड्यात शाहरुखने मदतीचा आराखडाही जाहीर केला होता. या आराखड्यानुसार आकडा जाहीर न करता रेड चिलिज इंटरटेन्मेंटकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तर, शाहरुखच्या कोलकाता नाइट रायडर्सकडून पीएम केअर फंडसाठी निधी देण्यात येणार आहे. या निधीचाही आकडा जाहीर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोलकाता नाइट रायडर्स, मीर फांउडेशन पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र सरकार सोबत मिळून ५० हजार संरक्षक किटचीसाठी मदत करणार आहे.


याचबरोबर १ महिन्यांसाठी मीर फाऊंडेशन, एक साथसोबत मिळून मुंबईतील साडेपाच हजार कुटुंबीयांना एका महिन्यासाठी अन्न पुरवणार आहे. आलटून पालटून मीर फाऊंडेशन आणि एक साथकडून जेवण पुरवले जाईल. मीर फाऊंडेशन रोटी फाऊंडेशनसोबत मिळून ३ लाख रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तींना अन्न पुरवणार आहे.
Powered By Sangraha 9.0