वांद्रेमध्ये जे घडले ते स्वीकारण्यासारखे नाही ; भज्जीचा संताप अनावर

14 Apr 2020 20:30:48

harbhajan singh_1 &n
मुंबई : वांद्रे स्थानकात परराज्यातून आलेल्या मजूरांनी ठिय्या मांडत पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या गर्दीला पांगवण्यात यश आले. यावरून लॉकडाऊनचा फज्जा राज्यामध्ये उडाल्याचे चित्र दिसून आले. यावरून ‘आज जे झाले ते न स्वीकारण्यासारखेच आहे.’ असे मत भारतीय क्रिकेटपटू हरभजनसिंग याने व्यक्त केले आहे. त्याने ट्विट करत झाल्या प्रकरणावरून संताप व्यक्त केला.
 
 
 
 
 
हरभजनसिंगने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “प्रत्येकाला घरामध्ये ठेवण्यासाठी कर्फ्यू हा एकच उपाय आहे. वांद्रे येथे जे आज घडले ते स्वीकारण्यासारखे नाही. लोकाना परिस्थितीचे गांभीर्य नाही आहे. स्वतःसोबत ते दुसऱ्यांचेदेखील आयुष्य धोक्यामध्ये टाकत आहेत.” याधीही त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लॉकडाऊनच्या निर्णयाचे समर्थन करत, या परिस्थितीमध्ये आपण घरातच थांबले पाहिजे असे आवाहन केले होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0