४३ देशांच्या २८ हजार नागरिकांसाठी भारत बनला 'देवदूत'

    दिनांक  14-Apr-2020 14:04:05
|
Air India_1  H
 
 
नवी दिल्ली : कोरोना विषाणूशी लढण्यासाठी भारत सरकारने देशातीलच नव्हे तर परदेशातील नागरिकांसाठीही देवदूत म्हणून काम पाहत आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांसह भारतातील विदेशी नागरिकांना मायदेशी पोहोचवण्याचे काम परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत केले जात आहे. आत्तापर्यंत ४३ देशांतील एकूण २८ हजार विदेशी नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे काम भारत सरकारने केले आहे, १५ मार्च ते ११ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार ही माहिती उघड झाली आहे. अजूनही हे मदतकार्य सुरूच आहे.
 
 
 
आत्तापर्यंत १२०० अमेरिका, १४०० कॅनेडा आणि २००० ब्रिटीश नागरिकांचा सहभाग आहे. याशिवाय युरोपातील नागरिकांनाही त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवले आहे. तसेच या देशांमध्ये फसलेल्या भारतीयांनाही परत आणण्याचे काम सरकारने केले आहे. आखाती देश आणि युरेशियातूनही भारतीयांना परत आणण्याचे काम करण्यात आले. बहुतांश नागरिक हे विमानतळापासून बऱ्याच दुरवर अडकले होते. त्यांना परत आणणे हे मोठे आव्हान होते,
 
 
 
सिंगापूरच्या सातशे जणांना त्यांच्या घरी सुरक्षित पाठवण्यात आले आहे. मलेशियातील ३००० लोक घरी पोहोचले आहेत. दक्षिण भारतात मोठ्या संख्येने मलेशियन नागरिक अडकले होते. ४०० ऑस्ट्रेलियन नागरिकांना त्यांच्या घरी सुरक्षित पाठवण्यात आले आहे. नुकतेच ४४४ ऑस्ट्रेलियन नागरिकांची एका विशेष विमानाने घरी जाण्याची सोय करण्यात आली. यात १४ न्युझीलंडचे नागरिकही होते. एकूण ६००० ऑस्ट्रेलियन नागरिकांनी दुतावासाकडे मदत मागितली होती. इस्त्रायल, ब्राझील आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. भारतातर्फे अनेक देशांना वैद्यकीय मदत पोहोचवण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबद्दल भारताचे आभार मानले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.