आव्‍हाडांचे १३ कार्यकर्ते पॉझीटिव्‍ह, ३ मुंब्रा पोलिसही करोना ग्रस्‍त

13 Apr 2020 22:30:24
Jitendra Awhad_1 &nb

 
 
ठाणे : राज्‍याचे गृह‍निर्माण मंत्री जितेंद्र आव्‍हाड यांचे १३ कार्यकर्ते व मुंब्रात सेवा बजावणारे इतर ३ पोलिस करोनाग्रस्‍त ठरल्‍याने आज ठाण्‍यात एकच खळबळ उडाली आहे तर कालपर्यंत ४६ आकडयावर सीमित असलेल्‍या ठाण्‍याने आज दिवसअखेर जवळपास ७६ इतका आकडा गाठल्‍याने एका दिवसात ३० रूग्‍ण वाढल्‍याने संपुर्ण ठाण्‍यात भितीचे वातावरण झाले आहे. महापालिका व पोलिस प्रशासनावर मात्र यामुळे प्रचंड ताण वाढला आहे.
मुंब्रामध्‍ये लॉकडाऊन उडालेल्‍या फज्‍जाचा फटका आता चांगलाच जाणवू लागला आहे. खुद्द स्‍थानिक आमदार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या सोबत असलेल्‍या १३ कार्यकर्त्‍यांना करोनाची लागण झाली आहे. तर तबलिगीच्‍या तपासणीसाठी मुंब्रातील काळसेकर रूगणालयात गेलेल्‍या तीन पोलिसांना देखील करोनाची लागण झाली. आमदार आव्‍हाड यांची चाचणी निगेटिव्‍ह आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्‍हणून त्‍यांनी स्‍वताला आपल्‍या बंगल्‍यात कॉरंटाईन करून घेतले आहे.
आजचा मंगळवार ठाण्‍यासाठी मात्र डोकेदुखीचा ठरला एका दिवसात ३० रूग्‍ण आढळून आले ठाण्‍यातील विविध भागात १४ रूग्‍ण पॉझिटिव्‍ह आढळून आल्‍याने शहराच्‍या प्रत्‍येक प्रभाग समितीत रूग्‍ण आता आढळून येत आहेत. दरम्‍यान एक करोनाग्रस्‍त रूग्‍ण ढोकाळी येथील डी मार्टला गेला होता म्‍हणून डी मार्ट आता सील करण्‍यात आला आहे. गेल्‍या दोन दिवसापासुन भाजी मार्केट बंद करण्‍यात आले आहेत. आता पालिका प्रशासन ठाण्‍यातील हॉटस्‍पॉट मधील रूग्‍णसंख्‍येची व करोनोची साखळी तोडण्‍यासाठी अधिक कडक उपाययोजन करणार असल्‍याचे समजते.
Powered By Sangraha 9.0