कोरोना कहर (भाग-४)

13 Apr 2020 19:35:47
corona_1  H x W


डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या नवीन प्रकारच्या कोरोना व्हायरसमुळे केवळ चीनमध्येच नाही, तर संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण तयार केले. जिकडे तिकडे तयार झालेल्या या भयग्रस्त स्थितीमुळे अनेक प्रकारच्या अफवा, नाना प्रकारच्या उपचारांबद्दल मेसेजेस सोशल मीडियावर फिरू लागले. फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांवर या प्रकारच्या संदेशांचा अक्षरक्षः पाऊस पडला. परंतु, याचा परिणाम म्हणून या व्हायरसबद्दलचे भय लोकांच्या मनात लगोलग वाढू लागले.


सर्वात मोठे भय म्हणजे कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला की, ‘असाध्य आजार होऊन लगेच मृत्यू होतो’ अशी भावना लोकांमध्ये पसरली तर या एका मोठ्या भयग्रस्त प्रश्नाचे उत्तर आहे- ‘नाही.’


कोरोना व्हायरसमुळे होणार आजार असाध्य नाही व वेळेत उपचार केल्यास जीवाला अजिबात धोका नाही. यासाठी आपण अलीकडच्या काळात येऊन गेलेल्या साथीच्या आजारांशी लेखात दिलेल्या तक्तत्यात तुलना केली आहे.



table_1  H x W:


चीनमध्येसुद्धा कोरोना व्हायरसमुळे होणार्‍या मृत्यूचा दर हा साधारणपणे २.५ टक्के इतका आहे आणि तपासानंतर असा निष्कर्ष निघाला आहे की, ज्या लोकांना या विषाणूची लागण झाली आहे ते लोक साधारण ५० पेक्षा जास्त वयाचे आहेत व त्यापैकी बर्‍याच लोकांना आधीपासून अस्थमा किंवा ’COPD' व मधुमेह अशाप्रकारचे आजार आहेत. १८ वर्षे व त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना या आजारापासून विशेष असा धोका नाही. ज्यांना याची लागण झाली, त्यांना अतिशय सौम्य असा ताप मात्र येऊन गेला. त्यामुळे पालकांनी मुलांच्या बाबतीत चिंता करण्याचे किंवा घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. प्रतिबंधात्मक उपाय मात्र करणे अत्यंत गरजेचे आहे.
(क्रमशः)


- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)
Powered By Sangraha 9.0