डोंबिवलीत कोरोनाचा आणखी एक रुग्ण

12 Apr 2020 16:49:35
Dombivali_1  H
 
 
 



कल्याण : कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ठरलेल्या डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच असून आज आणखी एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. आज सापडलेला रुग्ण डोंबिवली पूर्वेतील असून तो १९ वर्षांचा आहे. त्यामूळे कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या आता ५१ झाली असून त्यापैकी ११ जणांना डिस्चार्ज मिळाला असल्याची माहितीही महापालिकेने दिली आहे. तर ३७ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, या रुग्णाशी संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम आरोग्य प्रशासनाने सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १८९५ झाली आहे. यामध्ये मुंबईत ११३, रायगड एक, अमरावती एक, पुणे चार, मीरा-भाईंदर सात, नवी मुंबई दोन, ठाणे परिसर दोन, भिवंडीत एक, वसई विरार दोन, पिंपरी चिंचवड एक, असे १३४ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. पुण्यात कोरोनावर उपचार घेत असणाऱ्या दोन महिलांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१ झाली आहे. नाशिकमध्ये १३, नागपूरमध्ये १४ आणि भिवंडीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे.
Powered By Sangraha 9.0