दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले

12 Apr 2020 18:06:07
Delhi - NCR Earthquake_1&

नवी दिल्ली : दिल्लीतील एनसीआर येथे रविवारी सायंकाळी भूकंपाचे हादरे जाणवले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाच सेकंद हे धक्के जाणवले. हादरे जाणवल्यावर अनेकजण घराबाहेर पडले. दिल्लीसह नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आदी भागातही हे हादरे जाणवले होते. दरम्यान, कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे कुणालाही घराबाहेर फिरकू न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, मात्र, अशातच हे धक्के जाणवल्याने काही भागांत एकच गोंधळ उडाला होता.



 
Powered By Sangraha 9.0