लॉकडाऊनच्या काळात अश्विन, धोनी देतायत ऑनलाईन धडे

11 Apr 2020 16:32:47

r ashwin ms dhoni_1 
मुंबई : सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा प्रत्येक क्षेत्राला फटका बसला आहे. अशामध्ये क्रीडा क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. ऑलिम्पिक, आयपीएल सारखे महत्त्वाच्या स्पर्धा पुढे ढकलल्या तर विम्बल्डन सारख्या स्पर्धा रद्द केल्या गेल्या आहेत. अशामध्ये क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज खेळाडू प्रसार माध्यमांमार्फत चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. याहून वेगळे म्हणजे भारताचा फिरकीपटू आर. अश्विन आणि माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांनी ऑनलाईन प्रशिक्षण चालू केले आहे.
 
 
 
आर अश्विन आणि धोनी यांच्या अकादमीकडून खेळाडूंना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. फेसबुकवरून लाईव्ह प्रशिक्षक वर्ग भरवला जात आहे. धोनी स्वतः त्याच्या क्लासमध्ये प्रशिक्षण देत नसला, तरी त्याच्या अकादमीतील प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत. रविचंद्रन अश्विन मात्र स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे. त्यांच्या या ऑनलाईन ट्रेनिंगला चांगला प्रतिसादही मिळत आहे. धोनीच्या अकादमीचे मुख्य प्रशिक्षक सत्रजीत लाहिरी यांनी सांगितले की प्रत्येक प्रशिक्षण वर्गाच्या व्हिडीओला १०,००० पर्यंत व्ह्यू मिळतात.
 
 
Powered By Sangraha 9.0