‘भटकंती कट्टा’ही झाला डिजिटल!

11 Apr 2020 12:43:45

bhatkanti katta_1 &n


यंदाच्या भटकंती कट्ट्याचे ऑनलाइन आयोजन!


ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळेच घरात अडकले गेले आहेत. याच कारणामुळे गेल्या महिन्याचा पूर्वनियोजित भटकंती कट्टाही यामुळे रद्द करावा लागला. या संकटातून सगळे स्थिरस्थावर होण्यास थोडा अवधी लागेल असे वाटते त्यामुळे भटकंती कट्ट्याच्या आपल्या प्रवासात खंड पडू नये म्हणून भटकंती कट्टा ठाणे थेट आपल्या घरातच अवतरणार आहे. यातून वेगळ्या विषयाची माहिती होईल हे नक्की!


यंदाचा भटकंती कट्टा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून भरवला जाणार आहे. विषय ही आजच्या परिस्थितीला अनुरूप असाच आहे. करोनामुळे सारे जग थांबले आहे. प्रदूषण कमी झाले आहे, वन्यजीव आपल्या अधिक जवळ येत आहेत अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. किंबहुना पृथ्वी रिसेट होते आहे की काय असे वाटू लागलं आहे...पण हे खरं आहे का? या सगळ्या गोष्टीचा वन्यजीवांवर कसा परिणाम होत आहे? पुढल्या काळात याचा काय परिणाम होईल? इथपासून ते मानसिक आणि शारिरीक गोष्टीचा त्यांच्यावर काय बदल होणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कट्टयावर या विषयातील तज्ज्ञ अभिषेक साटम येणार आहेत. अभिषेक समुद्रजीव अभ्यासक असून सध्या तो वीर जिजामाता भोसले उद्यान (राणीची बाग), भायखळा येथे प्राणीशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे.


या कट्ट्यात सहभागी होण्यासाठी तुम्हाला https://www.facebook.com/BhatkantiKattaThane/ या फेसबुक पेजला लाईक करून थेट कट्ट्यात सहभागी होता येणार आहे. तुमचे या विषयीचे प्रश्न तुम्ही भटकंती कट्टा ठाणे पानाला मेसज करून आधीच पाठवू शकता. भटकंती कट्टा ठाणेचे हे ऑनलाइन स्वरूप प्राथमिक स्वरूपाचे आहे. करोनाच्या संकटातून मुक्त झाल्यावर नेहमीप्रणाने कट्टा पूर्ववत भरवला जाणार आहे.


Powered By Sangraha 9.0