वृक्षतोडीनंतर बोरिवली नॅशनल पार्कमधील 'त्या' भागावर ड्रोनने नजर

10 Apr 2020 18:44:33

drone_1  H x W:

अवैध बांधकामावर लाॅकडाऊनंतरच कारवाई

 
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' परिक्षेत्रातील साई बांगोडा गावाजवळ झालेल्या अवैध वृक्षतोडीनंतर प्रशासनाने या भागात ड्रोनच्या मदतीने नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. लाॅकडाऊननंतर पोलीसांचे संरक्षण मिळाल्यावर या भागातील बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात या भागामध्ये एका वन कर्मचाऱ्यावर हल्ला देखील झाला होता.
 
 
 
 
 
 
 
 
लाॅकडाऊन लागल्यानंतर विहार तलावाजवळील साई बांगोडा गावाजवळ अवैधरित्या वृक्षतोड झाल्याची घटना घडली होती. या परिसरात गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यावर हल्ला देखील करण्यात आला होता. राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारित येणाऱ्याया भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकाम झाल्याचे समोर आले आहे. प्लास्टिक आणि फाद्यांचे कुंपन घालून जमिनीच्या मोठ्या भागाची छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या बेकायदा बांधकामावर लाॅकडाऊननंतरच कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
 
 
 
गेल्या महिन्यात या भागात गस्तीवर असलेल्या आमच्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याने हा संपूर्ण परिसर संवेदनशील झाला आहे. अशा परिस्थितीत त्याठिकाणच्या अतिक्रमणावर पोलिसांच्या संरक्षणामध्येच कारवाई करणे उचित ठरणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. त्यामुळे लाॅकडाऊन संपल्यावर पोलीस संरक्षणाअंतर्गत या बांधकामावर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर याच परिसरात झाडांची तोडही झाल्याचे समोर आले होते. यासाठी दर दिवसाआड ड्रोनच्या सहाय्याने या संपूर्ण परिसराची पाहणी करत असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0