मोदींचे अमेरिकेतर्फे समर्थन : इतिहासात पहिल्यांदाच घडली 'ही' गोष्ट

    दिनांक  10-Apr-2020 16:14:16
|

PM Modi And Donald Trump
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरोधात ज्या प्रकारे देशाचे नेतृत्व केले आहे, याचे कौतूक जागतिक स्तरावरून वेळोवेळी झाले. मात्र, इतिहासात प्रथमच व्हाईट हाऊसच्या ट्विटर अकाऊंटद्वारे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फॉलो करण्यात आले आहे. बिगर अमेरिकन नेत्यांना व्हाईट हाऊसतर्फे फॉलो करण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्हाईट हाऊसच्या ट्विटर अकाऊंटतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुरुवारी फॉलो केले. कोरोना विरोधातील लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी एक जागतिक नेतृत्व म्हणून काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी सार्स देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. तसेच जगभरातील देशांच्या प्रमुखांशीही चर्चा केली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हाईट हाऊस तर्फे भारतीय अमेरिका दुतावास असलेल्या 'U.S. Embassy India' आणि 'India in USA' ही दोन्ही ट्विटर अकाऊंट फॉलो करण्यात आली आहेत. भारत-अमेरिका दरम्यानच्या दृढ संबंधांचे हे देखील एक प्रतिक आहे. केवळ १९ अकाऊंट फॉलो करणाऱ्या व्हाईट हाऊस ट्विटर अकाऊंटमध्ये जागतिक नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहिले जात आहे.

tweet _1  H x W
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.