हरयाणात कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार; महाराष्ट्रात अर्धाच

10 Apr 2020 15:13:22
Nitesh Rane _1  
 
 

नितेश राणे यांचा राज्य सरकारला प्रश्न


मुंबई : कोरोना विरोधात लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. त्यामुळेच हरयाणात भाजप सरकारतर्फे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. याऊलट परिस्थिती महाराष्ट्रात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना केवळ निम्म्या पगारावर काम करावे लागत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणी राज्य सरकारला सवाल विचारला आहे.


  
"हरयाणा सरकारने वैद्यकीय क्षेत्रासाठी दुप्पट वेतन देऊ केले आहे. महाराष्ट्रात केवळ अर्ध्या पगारात आरोग्य कर्मचाऱ्यांना राबवून घेण्यात येत आहे. दोन राज्यातील सरकारमध्ये हाच फरक आहे.", असा टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणावर महसुल थकीत असल्याचे समजते. या कारणास्तव पुढील तीन महिन्यांचे वेतन देण्यासाठी राज्याला कर्जाची गरज भासणार आहे, अशी शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.




Powered By Sangraha 9.0