पोलीसामधील देवाचे दर्शन; काॅन्स्टेबलची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

01 Apr 2020 20:47:08
police _1  H x

सहाय्यता निधीला १० हजारांचे सहाय्य

 
 
 
मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून मुंबईकरांना दूर ठेवण्यासाठी मुंबई पोलीस जीवाचे रान करत आहेत. या परिस्थितीत खाकीतल्या देव माणसाची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. मुंबई पोलीस विभागातील काॅन्स्टेबल श्रीदर्शन डांगरे यांनी मुंख्यमंत्री कोरोना सहाय्यता निधीमध्ये १० हजार रुपयांचे योगदान दिले आहे.
 
 
 
 
 
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईकरांच्या रक्षणासाठी मुंबई पोलीसांचे हजारो कर्मचारी चोवीस तास कार्यरत आहेत. उन्हाताणाचा विचार न करता ही मंडळी मुंबईकरांच्या सेवेत तत्परतेने उभी आहेत. प्रसंगी कोरोना संसर्ग होण्याची भिती असताना देखील आपल्या घरच्या मंडळींना सोडून ही माणसं मुंबईकरांच्या सेवेसाठी काम करत आहेत. काही पोलीस गोरगरिबांना जेवण देतानाही दिसून येत आहेत. कोरोनाच्या लढ्याला आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची घोषणा केली. या निधीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशात डोंगरी पोलीस विभागातील हेट काॅन्स्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी या निधीला १० हजार रुपयांची मदत केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे डांगरे यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी देशमुखांनी डांगरेंचे तोंड भरुन कौतुक करुन महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार मानले.
Powered By Sangraha 9.0