धक्कादायक ! 'त्या' तबलीगींनी ५ एक्स्प्रेसने केला प्रवास

01 Apr 2020 19:08:40


tabligi_1  H x


नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलीगी जमातीच्या मरकझमध्ये सहभागी झालेल्या लोकांमध्ये करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आधीच कोरोनाशी लढा देणाऱ्या देशापुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. याचे कारण म्हणजे निझामुद्दीनच्या मरकझमध्ये सहभागी झालेल्या हजारो लोकांनी ५ लांब पल्ल्यांच्या ट्रेनने प्रवास केला आहे. आता भारतीय रेल्वेने या पाच एक्स्प्रेस गाड्यांमधील प्रवाशांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. करोनाचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीने रेल्वेने उचललेले पाऊल अत्यंत महत्वाचे मानले जात आहे.



तबलीगी जमात मरकझमधील लोकांनी प्रवास केलेल्या या ५ गाड्या १३ मार्च ते १९ मार्च या कालावधीत रवाना झाल्या आहेत. या गाड्यांमध्ये आंध्र प्रदेशात जाणारी दुरंतो एक्स्प्रेस
, चेन्नईपर्यंत जाणारी ग्रँड ट्रंक एक्स्प्रेस आणि तामिळनाडू एक्स्प्रेस, नवी दिल्ली-रांची राजधानी एक्स्प्रेस आणि एपी संपर्क क्रांती एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.



जमातीच्या किती लोकांनी ट्रेनमधून प्रवास केला याचा नेमका आकडा रेल्वेकडे नाही. या मुळे रेल्वेसाठीही हा मोठ्या चिंतेचा विषय बनला आहे. मात्र
, याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रेनमध्ये सुमारे १००० ते १२०० प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी असतात. या सर्वांना धोका असू शकतो. रेल्वे जिल्हाधिकाऱ्यांना प्रवाशांची यादी उपलब्ध करून देत असून या यादीतील नावाची पडताळणी करण्यात येत आहे. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचा शोध घेतला जाणार आहे.

Powered By Sangraha 9.0