रैनाच्या मदतीवर पंतप्रधान म्हणाले ‘ब्रिलियंट’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2020
Total Views |

suresh raina_1  
नवी दिल्ली : कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेक स्तरांमधून मदतीचा हात पुढे केला जात आहे. क्रीडा क्षेत्रातूनही अनेक खेळाडूंनी स्वतःच्या परीने कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी चालू केलेल्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निधीमध्ये रक्कम जमा करत आहेत.
 
 
 
 
 
 
भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनानेदेखील पंतप्रधान कोरोनाग्रस्त निधीमध्ये ३१ लाख तर मुख्यमंत्री निधीमध्ये २१ लाख जमा केले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, ‘हे एक उत्तमरित्या झळकावलेले अर्धशतक आहे.’ असे आगळ्यावेगळ्या पद्धतीने आभार मानले आहेत.
 
 
 
 
 
सुरेश रैनाने पंतप्रधान सहायता निधीमध्ये ३१ लाख तर उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीला २१ लाखांची रक्कम दिली. करोनाविरोधातील लढ्यात आपण सर्वांनी आपल्याला जमेल तितकी रक्कम दान करावी असे रैनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे. यावर पंतप्रधान मोदींनी अनोख्या पद्धतीने त्याचे आभार मानले.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@