दिल्ली हिंसाचार : ताहीर हुसेनचा फरार भाऊ अखेर पोलिसांच्या ताब्यात

09 Mar 2020 14:57:41
shah alam_1  H


शाह आलम चांदबाग हिंसेत सहभागी असल्याचा आरोप



नवी दिल्ली : दिल्ली दंगली प्रकरणी पोलिसांनी आम आदमी पक्षाच्या ताहीर हुसेन याला अटका केली होती. त्यानंतर आता ताहीराच्या भावाला अटक करण्यात आली आहे. शाह आलम असे त्याचे नाव असून, त्याच्यावर चांदबाग हिंसेत सहभागी असल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. अखेर सोमवारी दुपारी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.


दिल्लीत २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या हिंसा प्रकरणांत पोलिसांनी त्रिलोकपुरी भागातून पोलिसांनी दानिश नावाच्या एका इसमाला अटक केली असून, दानिश 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'चा (पीएफआय) दिल्लीचा इन्चार्ज आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी (सीएए) आंदोलनादरम्यान त्याने जाणून-बुजून लोकांच्या भावना भडकावत हिंसा पसरवली, असा त्याच्यावर आरोप आहे.

दुसरीकडे, उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या दंगलीमध्ये आयबीचे अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या आणि दंगल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ताहीर हुसेनकडून क्राईम ब्रान्चच्या हाती काहीही लागलेले नाही. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ताहीरचा एक मोबाईल कदाचित या प्रकरणाला वेगळे वळण देऊ शकतो. या मोबाईलमधून काही व्हॉटसअप मॅसेज किंवा इतर मॅसेजच्या साहाय्याने दंग्यात ताहीरची नेमकी काय भूमिका होती? याचा थांगपत्ता लागू शकेल, अशी त्यांना आशा आहे. दिल्ली दंगली प्रकरणात आत्तापर्यंत तब्बल ७०२ एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. तर २३८७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.


Powered By Sangraha 9.0