मनसेचा 'अरुणोदय'... राज ठाकरे करणार शॅडो कॅबिनेटची घोषणा !

09 Mar 2020 10:48:21

mns_1  H x W: 0
 
 
मुंबई : राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनकडे सर्वांची नजर लागली आहे. आज वाशीमधील विष्णूदास भावे नाट्यगृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतल्यानंतर हा त्यांच्या पहिलाच वर्धापन दिन मानला जात आहे. तसेच, यादिवशी शॅडो कॅबिनेटचीदेखील घोषणा होणार आहे. कोणाची नजर कोणावर असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
पहिल्यांदाच मुंबईबाहेर पक्षाचा वर्धापन दिनाचा मेळावा होत आहे. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे इतरही नेते उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून मनसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ राज यांनी पोस्ट केला आहे. त्यात शिवरायांची राजमुद्रा असलेला नवा झेंडा असून भगव्याच्या पार्श्वभूमीवर हा झेंडा फडकताना दिसत आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार हा मनसेसाठी अरुणोदय असल्याचा संदेशही या व्हिडिओच्या माध्यमातून राज यांनी दिला आहे.
Powered By Sangraha 9.0