सलग चौथ्या दिवशी तेलाच्या दरात घसरण

09 Mar 2020 12:21:25

petrol diseal_1 &nbs
 
 
मुंबई : आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये तब्बल ३० टक्के घसरण झाली आहे. तसेच, पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग चौथ्या दिवशी कमी झाले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार प्रतिलिटर पेट्रोल २४ पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी स्वस्त झाले आहे. मुंबईमध्ये प्रति लिटर डिझेलचा दर ६६.२४ पैसे तर दिल्लीमध्ये ६३.२६ पैसे आहे. मुंबईमध्ये प्रति लिटर पेट्रोल ७६.२९ पैसे तर दिल्लीमध्ये ७०.५९ पैसे आहे.
 
 
 
महाराष्ट्रामध्ये इंधनावरील व्हॅट वाढवण्यात आला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडताना ही घोषणा केली होती. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर एक रुपयांनी वाढणार आहेत. तेल उत्पादन कमी करण्यासंदर्भात ओपेक आणि रशियामध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे नव्या 'दर' युद्धाची सुरुवात झाली आहे. अमेरिकेत तेलाचे दर २७ टक्क्यांनी कोसळले आहेत. चार वर्षातील हे नीचांकी दर आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0